अहमदनगर (प्रतिनिधी) – आपल्या अहमदनगर शहराला पर्यटन विकासाच्या मोठ्या संधी असून शहरातील मान्यवरांशी चर्चा करून या संदर्भात शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा शासनाला सादर करून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून उद्याच्या तरुणाईला आपल्या शहराचा अभिमान वाटावा असे ठोस पावले आपल्या सर्वांच्या सहकार्याने उचलण्याची गरज आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नगरच्या पर्यटन विकासासाठी जगताप यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली असून लवकरच शहराच्या पर्यटनाचा आराखडा शासनाकडे सादर करण्यासाठी श्री. जगताप व रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांच्या पुढाकारातून शनिवारी विविध क्षेत्रातील पर्यटन प्रेमी व्यक्तींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्रीधर केळकर, सकाळचे संपादक एड डॉ श्री बाळ ज बोठे, प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री शिवाजी शिर्के, लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, उद्योजक अण्णाशेठ मुनोत, समाचारचे संपादक श्री महेन्द्र कुलकर्णी, यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी मांडलेल्या विचारांबरोबरच नगरसेवक श्री गणेश भोसले, संजय चोपडा, गौतम मुनोत आदेश चंगेडीया, रफिक मुंनशी, भूषण देशमुख, प्रा. प्रियदर्शन बंडेलू, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री सलिम शेख, प्रा. माणिक विधाते, श्रीनिवास बोज्जा, मेहेर तिवारी, प्रकाश छल्लाणी, स्वप्नील मुनोत, एड आर आर पिल्ले, प्रा सीताराम काकडे, नगर रायझिंगचे संदीप जोशी, महेश कांबळे,पुष्कर तांबोळी, विशाल लाहोटी यांनी नगरच्या पर्यटन विकासा संदर्भात विविध मौलिक सूचना मांडल्या.
आ. जगताप यांनी शहराच्या कचराकुंडी मुक्ती अभियान, शहर बस सेवा, स्वच्छता, याकडे विशेष लक्ष देणे सुरू असून सिना नदी संदर्भात विधानसभेत प्रश्न मांडल्यानंतर सिना नदी अतिक्रमण काढण्यात यश मिळत आहे. पर्यटन व सांस्कृतिक दृष्ट्या शहर संपन्न होण्यासाठी निश्चितपणाने यापुढील काळात प्रयत्न करण्यात येईल.
प्रारंभी अहमदनगर शहरावर मनापासून प्रेम करीत आपले बहुमोल योगदान देणारे कोहिनूरचे संचालक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीस सुरुवात करण्यात आली. जयंत येलुलकर यांनी बैठकी मागील हेतू विशद करीत शहरातील विविध धार्मिक वास्तू, ऐतिहासिक स्थळे ही आपल्या शहराची तिर्थस्थळ असून आजही हजारो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येत असतात.
यावेळी माजी आमदार कै. अनिल राठोड, प्रदिप गांधी, उद्योजक कै. माणकशेठ बोथरा, कै.सोमनाथ धुत, कै. बाबासाहेब गाडळकर तसेच करोना संसंर्गमुळे दुःखद निधन पावलेल्या नगरवासियांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास सर्वश्री रमेश जंगले, श्रीकांत मांढरे, सौ शारदा होशिंग,सुदर्शन कुलकर्णी, ऋषिकेश येलुलकर, सूचित मुथा, सुहास शिरसाठ, सुशील शिंदे आदी उपस्थित होते.
शहराच्या पर्यटन विकासासाठी रस्ते मजबूत व गुणवत्तेचे असणे गरजेचे आहे, स्वच्छता महत्वाची असून विविध स्थळांची माहिती होण्यासाठी माहिती फलक असणे, शहरातील अभियंते, व आर्किटेक्ट यांच्याकडून त्यांची मते मागवावी, पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आमदार व खासदार निधीतील दहा टक्के निधी पर्यटन विकासासावर खर्च व्हावा, भुईकोट किल्ल्याचे सुशोभिकरण करून तेथे लेझर शो व उद्यान विकसित व्हावे, शहरातील चौक सुशोभित करावीत. दरवर्षी एका पर्यटन स्थळांवर लक्ष केंद्रित करून त्यावर5 आमदार, खासदार निधी खर्च करावा, सिनेमा व मालिकांच्या चित्रीकरणासाठी चित्रनगरी उभारावी, सोयी उपलब्ध व्हाव्यात, पर्यटन विकासासाठी जगभरातील नगरकरांची मदत घ्यावी. चांदबिबी महालावर विविध विकास करीत तेथे मुलांसाठी मिनी रेल्वे व्हावी. आदी अनेक मौलिक सूचना उपस्थितांकडून मांडण्यात आल्या.







