पत्रकार सुरेश खोसे पाटील यांची ‘महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ’ अहिल्यानगर जिल्हा निवड समिती अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ

अहिल्यानगर (उपसंपादक दिपक वरखडे) | राज्यातील पत्रकारांची अग्रगण्य आणि नामांकित संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई’ च्या अहिल्यानगर (दक्षिण) जिल्हा निवड समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सुरेश खोसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे राज्य नेतृत्व आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सुरेश खोसे पाटील यांनी पत्रकारिता क्षेत्रात बजावलेली उल्लेखिनीय कामगिरी आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर घेतलेली आक्रमक भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत करणे, नवोदित पत्रकारांना व्यासपीठ मिळवून देणे आणि पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारणे, यावर आपला भर असेल, असा विश्वास यावेळी सुरेश खोसे पाटील यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here