खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा हसन मुश्रीफ साहेब यांची भेट महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने राज्याध्यक्ष उदय जी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काल भेट घेतली व विविध विषयावर चर्चा केली चर्चा अतिशय सकारात्मक झाली व पुढील विषयावर चर्चा करण्यासाठी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला 31 ऑक्टोंबर नंतर रितसर मंत्रालयामध्ये भेटीची वेळ देण्याचे ठरले.
राज्याध्यक्ष यांनी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. या वेळी विविध विषयाचे निवेदन सादर करण्यात आले, यामध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत,शिक्षण सेवकांचे मानधन 25000 रू करावे, नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन लागु करावी, दि.27/02/2017 च्या शिक्षक बदली आदेशात आवश्यक ते बदल व्हावेत, सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, जिल्हा परिषद शाळांना ऑनलाइन कामासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणेबाबत,जि प शाळांची वीज बिले ग्रामपंचायती मार्फत भरणेबाबत योग्य ती कारवाई करणे बाबत, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे भरण्यात यावी, MS-CIT संगणक अहर्ता मुदतवाढ मिळावी, शिक्षकांना मिळणार्या वैद्यकीय प्रतिपुर्ती लाभाच्या योजनेत कोवीड -१९ या साथ रोगाचा समावेश करण्यात यावा. हे विषय व अन्य शिक्षकाच्या प्रलंबित विषयवार चर्चा करणेसाठी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला 31 ऑक्टोंबर 2020 नंतर मंत्रालयात वेळ देऊन सर्व विषय सोडवणुकीसाठी आश्र्वासन दिले.
यावेळी उपस्थित शिष्टमंडळात राज्य कार्यकारिणी सदस्य जोतीराम पाटील,ओमाजी कांबळे,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.अर्जुन पाटील,श्री सरचिटणीस प्रमोद तौदकर,सांगली जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब लाड,जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री डी.एम. कुंभार.श्री बाबुराव चव्हाण. कागल तालुकाध्यक्ष श्री अरविंद पाटील व सांगली टीम चे सर्व शिक्षक उपस्थित होते असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर,औरंगाबाद शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर,जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड,नितीन नवले,शामभाऊ राजपूत,शालीकराम खिस्ते , गुलाब चव्हाण,विष्णू भंडारे , जावेद अन्सारी,मोहन्मद गौस , रऊफ पठाण,किसन जंगले , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतिश कोळी,चंदु लोखंडे,कडुबा साळवे,बबन चव्हाण,अर्जुन पिवळ,अशोक डोळस,के डी मगर , दिलीप ढमाळे,प्रकाश जायभाये,निंबा साळुंके ,कैलास ढेपळे ,अंकुश वाहुळ,जहांगीर देशमुख,पंजाबराव देशमुख,दत्ता खाडे ,विलास साळुंके,सुनिल बोरसे,पंकज सोनवणे,पंकज सोनवणे,दिलीप जाधव,विलास चव्हाण,शिलाताई बहादुरे,फातेमा बेगम,मंगला मदणे,वर्षा देशमुख,शितल भडागे,प्रतिभा राणे,वैशाली हिवर्डे,आदी पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.







