जळगाव (संपादक सुनिल पाटील) – अंतिम वर्ष पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे बरेच विद्यार्थी बी एड /एम एड अभ्यासक्रमाची सी ई टी देतात तेव्हाच त्यांचा वरील अभ्यासक्रमाचा, प्रवेश महाराष्ट्र शासन मान्यता देते.तथापी सदरची सीईटी दि .21,22,23 रोजी असल्यामुळे बरेच विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित राहतील.
त्यामुळे वरील दिवशी असलेल्या विद्यापीठ परीक्षा तात्काळ पुढे घ्याव्यात किवा त्याना परीक्षा देण्यासाठी पुढील मुदत मिळावी म्हणजे संबधित विद्यार्थी यांचेवर अन्याय होणार नाही, त्यांचे कोरोनाच्या महामारीमधे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.तरी विद्यापीठाने, अंतिम वर्षाच्या दि21,22,23 रोजी असलेल्या परीक्षा पुढे घेण्यात याव्यात, अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेस महानगर जळगावचे सचिव अँड कुणाल बी पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाणे यांनी केली आहे.







