पाचोरा बस स्टॅन्डवर चोरी करणारे अट्टल चोरटे पाचोरा गुन्हे शाखेकडून जेरबंद

पाचोरा

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । जिल्हयामध्ये बस स्टॅन्ड भागात चोरी करणारी टोळी सक्रीय असुन जिल्हा व पाचोरा शहरात चोरीचे गुन्हे उघड करुन आरोपीतांचे शोध घेवून कारवाई करणेबाबत पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी यांनी राहुलकुमार पवार पोलीस निरीक्षक पाचोरा यांना सुचना दिल्या होत्या.

दिनांक 24/03/2026 रोजी फिर्यादी सुभाष विठठल भावसार (वय ७० वर्ष रा. उप्पलखेडा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पिक बाजरीचे उत्पन्न विक्री करुन सदरची 50.000 हजार रुपयाची रक्कम घेवून पाचोरा बस स्टॅन्ड येथुन गावी पाचोरा बस स्टॅन्ड येथे बस मध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याबाबत पाचोरा पोलीस स्टेशन गु.र.नं. 131/2026 बी एन एस कलम 303 (2) प्रमाणे फिर्याद देवून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तरी दिनांक 24/03/2026 रोजी अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना गोपनीय माहीती च्या आधारे गुन्हे शाखेला आरोपी नामे 1) अंकुश मधुकर सुरवाडे वय 19 रा गेंदालाल मिल जळगाव जि. जळगाव सदर आरोपीवर जिल्हयात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असुन आरोपीस मु.पो.का.क-56 नुसार जिल्हयातुन 02 वर्षाकरीता हदददपार करण्यात आलेले आहे.) 2) विधीसंघर्ष बालक रा गेंदालाल मिल जळगाव जि. जळगाव (सदर विधीसंघर्ष बालकावर जिल्हयात विविध ठिकाण गुन्हे दाखल) असे दोन्ही आरोपी पाचोरा येथे येवुन चोरी केलेबाबत गोपनीय माहीती असल्याने व सदर आरोपी आज देखील बस स्टॅन्ड भागात चोरी करण्याच्या उददेशाने आलेले आहे अशी माहीती प्राप्त होताच गुन्हे शाखेची टीमने दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवुन कसुन विचारपुस केली असता आरोपी यांनी गुन्हयाची कबुली दिलेली आहे. गुन्हयाचा अधिक शोध पोलीसांमार्फत केला जात आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार पोकों योगेश पाटील पोकों/संदीप राजपुत पोकों/हरीश परदेशी पोकों/गणेश कुवर होम/पंकज सोनवणे होम/अमोल गायकवाड यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोहेकों/राहुल शिंपी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here