जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । लाडवंजारी युवा संघटनेतर्फे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पातुर येथील रहिवासी कु. रेणुका दिनेश केकन हिने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिचा जाहीर सत्कार करण्यात आला.
लाडवंजारी युवा संघटना, मेहरूण यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कु. रेणुका दिनेश केकन हिला सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, उपस्थितांनी तिच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास समाजातील पदाधिकारी, महिला मंडळ सदस्य, ज्येष्ठ नागरिक, विविध घटकांचे प्रतिनिधी, युवक-युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी वंजारी युवा संघटना अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन लाडवंजारी युवा संघटना, मेहरूण (जळगाव) यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना नाईक, सोनल लाडवंजारी, वैशाली लाडवंजारी, लता सानप, नीता लाडवंजारी, लता पाटील, मीना चाटे, वैशाली चाटे, शितल सानप, अनिता पाटील, जिजाबाई पाटील, मिराबाई पाटील, कविता लाडवंजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.







