जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । दिनांक 23/03/2026 रोजी 16.00 ते 23.00 वाजेपावेतो पोलीस अधिक्षक जळगांव यांचे आदेशान्वये नशिराबाद पोलीस स्टेशनचे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवित असतांना सपोनि योगिता नारखेडे यांना गुप्त माहीती मिळाली की नशिराबाद गावात बस स्टॅण्ड परीसरात भुसावळ शहर पोलीस स्टेशन कडील गु.र.न 288/2025 भा.न्या.सं. कलम 311,312 सह शस्त्र अधिनियम कलम 3/25 प्रमाणे दाखल गुन्हयातील फरार आरोपी नामे चेतन सुर्यभान पाटील हा कट्टा घेवुन दहशत माजवित फिरत आहे.
त्यावरुन सपोनि नारखेडे यांनी सफौ/1490 राजेश मेंढे, पोहेकॉ/2714 कमलाकर बागुल, पोकॉ/346 भरत बाविस्कर, पोकॉ/476 पंकज सोनवणे, पोकॉ/268 भुषण पाटील, पोकॉ/211 विजय अहिरे, अश्यांना सदर इसमावर कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने त्यांनी सदर इसमावर अचानक छापा टाकुन त्यांस 20.20 वाजता जागीच पकडले. त्याचे ताब्यातुन एक लोखंडी चंदेरी रंगाचा काळ्या रंगाची प्लास्टीक ची मुठ असलेला गावठी कट्टा तसेच एक डमी गावठी कट्टा जप्त करुन आरोपी नामे चेतन सुर्यभान पाटील, वय 18, रा. वरची अळी, नशिराबाद ता.जि. जळगांव यांस ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द नशिराबाद पोलीस स्टेशन येथे गु.र.न.93/2026 शस्त्र अधिनियम कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढिल तपास पोहेकॉ/2096 प्रशांत विरणारे हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग केदार बारबोले यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहायक पोलीस निरिक्षक योगिता नारखेडे यांचे पृथकातील अंमलदार सफौ/1490 राजेश मेंढे, पोहेकॉ/2714 कमलाकर बागुल, पोकॉ/346 भरत बाविस्कर, पोकॉ/476 पंकज सोनवणे, पोकॉ/268 भुषण पाटील, पोकॉ/211 विजय अहिरे यांनी केली आहे.







