जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । नविन बसस्टॅन्ड येथून मोटार सायकल चोरीला गेल्या वरुन जिल्हापेठ पो.स्टे.ला CCTNS No.११/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) प्रमाणे दिनांक २०/०१/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात प्रभारी अधिकारी जिल्हापेठ पो.स्टे. यांना मिळालेल्या गोपनीय बातमी वरुन त्यांनी जिल्हापेठ पो.स्टे.चे पथक तयार करुन सदर मोटार सायकलचा शोध घेत असतांना तांत्रिक विश्लेषणा वरुन आरोर्पीना निष्पन्न करुन आरोपी क्र.१) आकाश राजु खरे, रा.नांद्रा ता.पाचोरा जि.जळगाव ह. मु. पिंप्राळा हुडको जळगाव २) आकाश प्रकाश भिल, रा. कासमपुरा ता. पाचोरा जि. जळगाव यांना गुन्ह्याकामी अटक करून त्यांची मा. न्यायालयाकडून १ दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आली होती. त्यांना विचारपुस केली असता त्यांनी जळगाव शहरातील भज्जी गल्लीतून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवून त्यांच्या कडून होंन्डा कंपनीची ड्रिम मोटार सायकल क्र. MH१९DA५०११ ही काढून दिल्याने ती गुन्ह्याकामी जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोह महेंद्र पाटील हे करीत आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, नितीन गणापुरे, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव, अनिल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी जिल्हापेठ पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी श्री शांताराम देशमुख, पोह महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल सांळुके, गोविंद साबळे, जयेश मोरे यांनी काम केले आहे.







