विद्यार्थी वाहतूक व स्कूल व्हॅन चालक मालकांचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना गाऱ्हाणं

gulab-patil

धरणगांव (उपसंपादक प्रा पी एन पाटील) – विद्यार्थी वाहतूक व स्कूल व्हॅन चालक मालक यांचे आर. टी. ओ . टॅक्स. इंशुरन्स. व सर्व बॅक, फायनान्स कंपनी चे हप्ते भरण्यासाठी एक वर्षाकरिता मुदत वाढ मिळावी व त्यावरील व्याज माफ करावे, या मागणीचे निवेदन भगवे वादळ महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना च्या वतीने उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवास स्थानी दिले.

 

 

 

ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकल्यानंतर, या विषयी मी शासनाकडे पाठपुरावा करून योग्य ती मदत करण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले. यावेळी आदिवासी संघर्ष समिती चे मुख्य संयोजक मा . अॅड. गणेशजी सोनवणे, सुरेश नन्नवरे, अनिल नन्नवरे, नितीन कांडेलकर. योगेश बाविस्कर. संजय कांडेलकर. प्रमोद वाणी. संजय पाटील. विनोद कुमावत. भरत वाघ, आदी उपस्थित होते.

 

 

 

सद्यस्थितीत आलेल्या कोविड 19 या महामारीमुळे महामहाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यी वाहतुक व स्कूल व्हॅन चालक मालक यांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे घर चालविणे मुला बाळांना कसे पोसावे हे जिवन जगणे कठीण झाले आहे आता पर्यंत शासनाने कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत केली नाही भगवे वादळ महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना च्या वतीने लॉकडाउन काळात आर्थिक मदती सह विविध मागण्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी केली.

 

 

 

यावेळी प्रदेश अध्यक्ष अतुलजी खोंड. संपर्क प्रमुख योगेश बुऱ्हाडे उपाध्यक्ष विशाल गोरड. कार्याध्यक्ष मारुतीराव सावंत , राजेंद्र खताळ.सचिव आशिष वडवळे. सहसचिव आदेश आर्घ लक्ष्मीकांत वाघे. शिवाजी बोधे. राजु मोरे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पाटील, प्रमोद वाणी . अंड, गोविंद तिवारी विनोद कुमावत. भरत वाघ, अॅड. नरेंद्र पाटील, देविदास भङंगर. ज्ञानेश्वर शिवदे. सुनील वाणी. विजय अहिरराव राजेंद्र माळी यांच्या नेतृत्वाखालील विविध आंदोलन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले पण आज पर्यंत शासनाने विद्यार्थी वाहतुक चालक मालक यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे यासाठी २० | १० | २०२० पर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल अशा इशारा शासनास दिला. या वेळी ना. पाटील यांनी मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला.gulabrao-patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here