आधी नकार , मग स्ट्रगल आणि नंतर प्रत्येक रसिकांच्या गळ्यातील ताईत ..जणू तो आला.. त्याने पाहिले…आणि त्याने जिंकले ! असाच काहीसा अविश्वसनिय जिवन प्रवास आहे हिंदी चित्रपट सृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन यांचा.
खडतर प्रवासा नंतर 70 च्या दशकात जंजीर आला आणि अमिताभ यांच्या कडे दिग्दर्शक कहाण्या घेऊन रांगा लावू लागले यशाची पायरी – दर पायरी चढत असतांना इकडे महानायकाचा बजेटही वाढू लागला एकवेळ अशी आली की त्यांना घेऊन एखादा चित्रपट प्रदर्शित करायचा म्हटला तर बोटावर मोजण्या इतकेच एक – दोन डायरेक्टर तयार होत असत कारण बिग बी यांना घेऊन बिग बजेट सिनेमा करायला आपले अंथरुण किती ?याचाही विचार करावा लागे .त्यावेळी बऱ्याच दिगदर्शकांनीं नामी शक्कल लढवत इतर नायकांना पसंती देण्यास सुरुवात केली .आणि गम्मत बघा त्यांचे प्रयोग देखील सफल होऊ लागले .मग अमिताभ ऐवजी विनोद खन्ना धर्मेंद्र ,मिथुन दा असे एका पेक्षा एक सरस नायक सिनेसृष्टीत उदयास आले .अमिताभ यांना पर्याय म्हणून त्यांनी आपली पावलं खंबीर पणे रोवलीत .अश्या या साऱ्या सफल चेहऱ्या ना त्याकाळी गरिबो का अमिताभ बच्चन असेच अभिमानाने संबोधले जायचे !
आपल्याला 70 च्या दशकात घेऊन जायचे कारणही तसेच रोमांचक आहे .आज दि .13 ऑक्टोबर , माझे मित्र जेष्ठ बंधू , यशस्वी -अभ्यासू विधीज्ञ ऍड धर्मेंद्र सोनार ज्यांना मी आदराने , हक्काने भाऊ म्हणतो त्यांचा आज वाढदिवस .त्यांना या शुभदिनी माझ्या सारखा फाटका माणूस (पत्रकार म्हणून )सरस्वतीचं देणं…केवळ शब्दरूपी शुभेच्छा देऊ शकतो ,आणि तोच हा आजचा प्रयत्न..धर्मेंद्र भाऊ यांचाही वकिली व्यवसायात एक काळ असाच गेला आहे चोपडा न्यायालयात अनेक नामचीन वकील तेंव्हाही होते व आजही आहेत .पण गोर गरिबाला परवडेल , त्यांना असतील तेव्हढ्या पैशात.. तर कधीतरी पदरमोड करून न्याय,हक्क मिळवून देईल असा वकील कोण ?अशी भावनीक साद आजही घातली तर कोर्टाच्या आवारात बसलेले, फाटके तुटके कापडं घातलेले म्हातारे कोतारे आणि तिशीतली अँग्री यंग जनरेशन मोठ्या अभिमानाने सांगतात ‘हमारा गरीबो का अमिताभ बच्चन ..धर्मेंद्र सोनार वकील ‘!…( याचा अर्थ इतर वकील लुबाडतात असा होत नाही ही विनंती )
एकवेळ खायला नसले तरी चालेल ..पण कोर्ट कचेरी अन दवाखाना नक्को !असे अनुभवाचे बोल आपण प्रत्येकाने घरात बड्या बुजुर्गां कडून ऐकले आहे .ते उगाच नाही .सेवा हे व्रत असते तो पर्यंत ठीक असते. त्याचा व्यवसाय झाला की समाजावर अन्याय व्हायला वेळ लागत नाही .यात सारेच व्यवसाय आलेत अगदी याला आमची पत्रकारिताही अपवाद नाही .उलटपक्षी आमच्यावर समाज जागृती करण्याची,एखाद्यावर अन्याय होत असल्यास त्याला जाब विचारायची जबाबदारी असतांना आज वृत्तपत्र त्यांचे पत्रकार , वृत्तवाहिन्या त्यांचे प्रतिनिधी त्याचे अँकर काय करताहेत ? हे दररोज आपण बघतो – वाचतो आहोतच .असो
पण ज्याने गरीबी भोगली आहे ..अनुभवली आहे . जगली आहे ..चाखली आहे ..तो कधीच दुसऱ्या गरीबावर अन्याय करत नाही .धर्मेंद्र भाऊ आज नामवंत वकील आहेत हे आज सगळ्यांना माहीत आहे ,पण याच माणसाने शिक्षणाचा खर्च पेलला जावा , घरात आई बापाला घरखर्चात काहीतरी हातभार लावता येईल का ? म्हणून.. चोपड्यात रस्त्यावर लोटगाडी वर कंगवे, लहान आरसे असा किरकोळ सामान विकला आहे .कामाची लाज नाही आणि आज कमावले म्हणून माज नाही .आपल्या शालेय महाविद्यालयीन जीवनात एखादया चित्रपटाच्या नायका सारखे व्यक्तीमत्व तसाच देखणा बाणा, कोणीही घायाळ व्हावे असे पुरुषी सौन्दर्य. या आधारावर त्याकाळी चोपड्यात त्यांनी चोपडाश्री ( सौन्दर्य स्पर्धा ) हा बहुमान पटकावला आहे .उत्कृष्ट संघटन , साधी पण सिधी बोली , घायाळ करणारी भेदक नजर ,कायद्याचा गाढा अभ्यास पैशांची नसलेली लालसा यामुळे ते चोपडा नगर परिषदेत नगरसेवक म्हणून जनतेतून निवडून आले होते .रस्त्यावर सल्ला देणारा वकील म्हणूनही ते ख्यातनम आहेत .कुठलाही बडेजावपणा नाही .धर्मान्ध नाही पण धर्माभिमानी आहेत प्रखर हिंदुत्ववादी आहेत म्हणूनही त्यांचा विशेष अभिमान मला नेहमीच राहील .चोपड्यात आजवर गणपती विसर्जन मिरवणूक काळात , अथवा नवरात्र काळात कधीही दोन समाजात तेढ निर्माण होते . पोलिसांच्या केसेस मुलांवर होतात त्यावेळी सर्व हिंदू मुलांचे खटले फुकटात लढणारा हा नायक आहे .अगदी कागदा पासून तिकिटाचे पैसे सुद्धा घरून टाकणारा हा हिंदुसेवक आहे .हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या नंतर हिंदू जन नायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत झालेला हा सैनिक आहे . ऐन उमेदीच्या काळात हिंदुत्वासाठी अंगावर केसेस ओढवून घेणारा हा वकील आहे ….!
हे वाचकांना आवडावे म्हणून रंजकता भासवून केलेले लिखाण नाही .समाजाला वास्तव कळावे म्हणून स्वअनुभवातून मांडलेले हे शाब्दिक द्वंद्व आहे .अन्यथा गोलमोल लिहिणे ,कोणाचाही उगाच उदो – उदो करण्यासाठी लेखणी घासायची आणि संध्याकाळी त्याच्याकडून मिळालेल्या बोटी – बाटलीवर झडप मारायची हे मला जमले नाही आणि जमणार देखील नाही मी आजच्या 20 -22 वर्षांपूर्वीही वादग्रस्त पण सत्य लिखाणासाठी प्रसिध्द होतो. आणि आजही तीच माझी ओळख आहे .इथे एक उदाहरण मुद्दाम द्यावेसे वाटते .काही धर्मान्ध लोकांनी माझ्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारे लिखाण करतो म्हणून चोपडा न्यायालयात खटला दाखल केला होता .मनसे प्रमुख मा राजसाहेब ठाकरे यांच्यावर जसे दोन समाजात तेढ निर्माण करणारे भाषणं करतात म्हूणन जश्या केसेस झाल्या होत्या , अगदी तीच कलमं माझ्यावर देखील लावली होती .धर्मेंद्रभाऊ मला धीर देत काही होणार नाही मी बसलो आहे .म्हणत चेहऱ्यावर बेफिकरी दाखवत .आज विषय निघाला म्हणून सांगायला पाहिजे .लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील महत्वाचा स्तंभ न्यायपालिका का आहे .याचा अनुभव मला आला होता .त्यावेळी श्री खान म्हणून (पूर्ण नाव आज आठवत नाही) न्यायाधीश होते त्यांच्या बेंचवर सुनावणी झाली न्या .श्री खान यांनी दिलेले दहा पानी जजमेंट (निकाल) मी आजही सांभाळून ठेवला आहे .त्यांनी म्हटले एखादा राजकारणी दोन समाजात तेढ निर्माण करणारी भाषणं करू शकतो .कारण त्याला त्याचा पक्ष ,नेते ,कार्यकर्ते वाढवायची असतात हा त्यांचा वैयक्तिक स्वार्थाचा भाग असू शकतो .पण एखादा संपादक जेंव्हा समाजाभिमुख लिखाण करतो तेंव्हा त्याचा वैयक्तीक स्वार्थ नसतो .केवळ समाज जागृती हेच ध्येय त्यामागे असते .स्वातंत्र्य पूर्व काळात असे लिखाण लोकमान्य टिळक , स्वातंत्र्य वीर सावरकर , म .गांधी आदींनी केले आहे .म्हणून शाम जाधव नामक संपादकावर खटला दाखल होऊ शकत नाही …. !
हा निकाल आणि निकालाची प्रत स्वतः धर्मेंद्रभाऊ घेऊन माझ्या कडे आले .आणि म्हणाले, शामभाऊ मी म्हटले होते काही होणार नाही .तुम्हाला कोर्टात सुनावणीला देखील यायची गरज पडू दिली नाही कारण तुम्ही लिहिलेले ‘ वास्तव ‘हे खरंच वास्तव आहे .याला कुठेही चॅलेंज नाही. ! या संकट काळात जे काही बोटावर मोजण्या इतके हिंदू बांधव माझ्यासाठी माझ्या पाठीमागे उभे होते त्यांचा तर मी काम ऋणी राहणार आहे .धर्मेंद्रभाऊ यांचा नम्र आणि शालीन पणा एका वाक्यात सांगता येण्या सारखा आहे .ते नेहमी सांगत आई – वडील माझ्या कडे राहात नाहीत तर मी आजही आई – वडीलांमध्ये राहतो .त्यांच्या यशामागे जशी त्यांची मेहनत , त्यांची इमानदारी आहे तशी त्यांच्या अर्धागिणी सौ वहीनी यांचाही त्याग महत्वाचा आहे …..
धर्मेंद्रभाऊ आपण यशवंत व्हा , किर्तीवंत व्हा ,खूप मोठ्ठे व्हा . आई भवानी आपणांस निरोगी दीर्घायुष्य देवो , आपल्या हातून समाजाची सेवा घडो , हिंदू धर्मकार्य घडो याच प्रार्थना !!! आणि पुन्हा एकदा वाढ दिवसाच्या शुभ कामना .
शाम जाधव ( पत्रकार )
अध्यक्ष – प्रेरणा दर्पण फाऊंडेशन चोपडा (9822325717)







