डॉक्टर दिना निमित्ताने डॉक्टर आणि कोविड योद्धा यांचा युवासेने कडून सत्कार

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातदेखील कोरोनाचे थैमान सुरु आहे आणि या कोरोना विरोधातील लढ्यासाठी अनेक लोक योगदान देत आहे. यासाठी डॉक्टर देखील आपले जीव धोक्यात टाकून आपले सेवा कार्य करत आहे .
शिवसेना नेते युवासेना प्रमुखमंत्री. आदित्य ठाकरे ,पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांचे निर्देशानुसार व युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक कुणाल दराडे, किशोर भोसले यांचे पुढाकाराने आज १ जून डॉक्टर दिनानिमित्ताने युवासेनेकडून कोरोना विरुध्द लढ्यासाठी काम करणाऱ्या डॉ चंदनजी महाजन आणि कोविड योद्धा विशाल परदेशी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी पियुष गांधी, विद्यापीठ संपर्क युवा अधिकारी अंकित कासार, महेश ठाकूर, यशश्री वाघ आणि पूजा लुनिया आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here