भारतीय प्रसारमाध्यमांबाबत चीन सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात मोठी चकमक झाली होती. या चकमकीबाबतची प्रत्येक घडामोडीची माहिती भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात होती. तसेच त्यानंतर आता चीन सरकारकडून याबाबतच नवा प्लॅन आखला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून चीनने आता भारतीय प्रसारमाध्यम आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत.
चीनकडून जवळपास 10 हजार वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही सोशल नेटवर्किंग साइट्चाही समावेश आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासह ब्लूमबर्ग, वॉल स्ट्रीट जर्नल, द न्यूयॉर्क टाइम्स यांचाही समावेश आहे, अशी माहिती साऊथ चीन मॉर्निंग पोस्टने दिली आहे.
भारत-चीन या दोन्ही देशात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन सरकारने मुखपत्र असणाऱ्या वेबसाईट्स आणि वृतपत्रांमधील माहिती भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर लगाम कसा लावता येईल, याकडे सध्या चीन सरकारचे लक्ष आहे. त्यानुसारच भारतीय प्रसारमाध्यमे आणि भारतीय वेबसाईट्सना चीनमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या सर्व वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here