मुंबई (प्रतिनिधी) – बॉलीवूडमधील ‘नेपोटिझम’ म्हणजेच ‘भाई-भतीजावाद’ किंवा कंपुगिरीबाबत प्रथम आवाज उठवला तो कंगना रणौतने. आता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हा विषय आणखीच चर्चेत आला आहे. यानिमित्ताने अन्यही अनेक कलाकार आपल्याला याबाबत कसा अनुभव आला याची मोकळेपणाने माहिती देत आहेत. सध्या एक आंतरराष्ट्रीय स्टार बनलेल्या प्रियांका चोप्रानेही नुकतीच याबाबतची माहिती दिली. आपल्यालाही नेपोटिझमची झळ लागली होती आणि वाईट वागणूक मिळाली होती असे तिने म्हटले आहे.
प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले की याठिकाणी अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. इथे स्टारकिडस्ना आपल्या कुटुंबाचे नाव राखण्याचा दबाव असतो. प्रत्येक स्टारची स्वतःची एक कहाणी असतेच. माझ्या संघर्षाच्या काळात मलाही बरेच काही सहन करावे लागले होते. एका चित्रपटातून मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.







