जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भोणे येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट

bhone

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी भोणे येथे उभारी योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी युवराज पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे.

 

 

या भेटीत त्यांनी त्यांच्या वारसांची आस्थेने चौकशी केली तसेच पुरवठा विभानंतर्गत धान्याचे वाटप केले. सदर वारसांना सिंचन विहीर, संगायो लाभ, बचत गट लाभ व इतर योजनांचे लाभ देण्याचे सुचित केले. तत्पूर्वी त्यांनी कृषी विभागाच्या धरणगाव येथील अनिल कणखरे यांच्यापीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटला भेट दिली.

 

 

 

जिल्हाधिकारी यांनी स्वतः समक्ष शेतात उभे राहून कापूस वेचणी व कापसाचे मोजमाप करून घेतले. नंतर भोणे येथे लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात कृषी विभागाच्या औजार बँकेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष जाधवर, तालुका कृषी अधिकारी अनिल माळी, मंडळ अधिकारी वनराज पाटील, तलाठी अविनाश पाटील, लिपिक गणेश पवार इ. हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here