वेब मीडिया असोसिएशन मुंबई कायदेशीर सल्लागार पदी मुंबई येथील उच्चशिक्षित क्रिमिनोलॉजिटस स्नेहील ढाल यांची एकमताने निवड

snehil-dhaal

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – देशातील उच्चस्तरिय IAS, IPS,अधिकार्यांना ट्रेंनिग देणारे UK येथून क्रिमिनोलॉजिटस( Criminologist) डिग्री संपन्न असलेले कायदे तज्ञ स्नेहील ढाल हे वेब मीडिया असोसीएन ला लाभले कायदेशीर सल्लागार पदी यांची झाली निवड.

 

 

 

वेब मीडिया असोसिएशनच्या मुबंई येथील मुख्य कार्यालयात बैठक संपन्न झाली सदर बैठकीत वेब मीडिया असोशिएनच्या कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात आली वेब मीडिया असोसिएशन कडे देशातील व परदेशातील एखादा विषय किंवा मुद्दा उपस्थित झाल्यास यावर मार्गदर्शन व पत्रव्यवहार करण्यासाठी मुंबई येथील उच्चशिक्षित क्रिमिनोलॉजिटस(Criminologist ) स्नेहील ढाल यांची कायदेशीर सल्लागार पदी नियुक्त करण्यात आली आहे.

 

 

 

 

स्नेहील ढाल क्रिमिनोलॉजिटस(Criminologist ) तज्ञ आहेत परदेशात युके येथे यांनी शिक्षण घेऊन क्रिमिनोलॉजीचीCriminologist) डिग्री संपन्न केली आहे व राष्ट्रीय पातळीवर अनेक शासकीय संस्था व संस्थेमधील उच्चस्तरीय IAS. IPS.अधिकाऱ्यांना व दहशदवादी विरोधी पथक मधील अधिकारऱ्यांना ते मार्गदर्शन व ट्रेनिंग देत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा संबंधी विषय असल्यास सर्व शासकीय संस्था उदा. डिफेन्स, शहरी भागातील पोलीस अधीकारी, कर्मचारी,राज्य पोलिस दल,सेंट्रल पोलीस दल या सर्व प्रकारच्या अधिकारी वर्गाला स्नेहील ढाल यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

 

 

 

 

वेब न्यूज पोर्टल, वेब सिरीज, सोशल मीडिया कंपनी,भारतात किंवा भारताच्या बाहेर चालवणार्या सर्व व्यवस्थापकांना किंवा वेबसिरीज कंपन्या बाबत कुठल्याही काही अडचणी येत असेल तर वेब मीडिया असोसिएशन च्या माध्यमातून सर्व संस्थांना कायदेशीर न्याय व मार्गदर्शन मिळवून दिले जाईल तसेच वेब न्यूज पोर्टल च्या वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना कायदेशीर मदत करण्यात येईल. वेबमीडिया मध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना मदत करण्यात येईल व स्नेहील ढाल यांच्या बुद्धिमत्तेचा योग्य रीतीने समाज उपयोगी कामासाठी यांचा उपयोग केला जाईल असे यावेळी वेळी वेब मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन व स्नेहिल ढाल यांनी पत्रकारांना बोलतांना सांगितले.webmedia

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here