धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – आज दिनांक १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन या दिनाचे औचित्य साधून राज्यसरकारने महाराष्ट्रातील सर्व वाचनालये उघडण्याचे संकेत राज्यातील ग्रंथपालांना दिले असल्याचे अधिकृत वृत्त आहे.
अधिक माहिती अशी की, वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून राज्यातील ग्रंथालये लवकर सुरू करू,अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्यानंतर गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर या वाचन प्रेरणा दिनानिमित राज्यातील सर्व वाचनालये उघडण्यात यावेत असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.उद्यापासून ग्रंथालये उघडणार असल्याने वाचकांना वाचन प्रेरणदिन साजरा करता येणार आहे!
राज्यातील सर्व अनुदानित आणि खाजगी वाचनालये सुरू करावीत असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वाचनालये उघडण्यास सांगितले आहेत.राज्यात एकूण बाराहजार दोनशे वाचनालये सहा महिन्यांपासून बंद आहेत! त्यामुळे वाचन चळवळ ठप्प झाली आहे.वाचनालये सुरू करावीत म्हणून सतत सूचना येत होत्या मात्र गर्दीचे करण देत ते बंदच ठेवली जात असे!
अखेर सोमवारी जेष्ठ रचनाकार रामदास फुटाणे म्हणाले होते की,कोरोना काळात वाचन संस्कृती ठप्प झाली आहे.राज्यात दारूची दुकाने,वाइन शॉप उघडली जाऊ शकतात मग वाचनालये बंद का? वाचनालय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.राज्य सरकार भाषेचा विकास करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी दाखविते किंबहुना खर्च करते! त्यामुळे सरकारकडून वाचनालय बंद हा विरोधाभास आहे! असेच म्हणावे लागेल! वाचनसंस्कृती ज्याच्याकडे आहे त्याच्या निर्णय क्षमतेत वाढ होते!
जेष्ठ रचनाकार रामदास फुटाणे यांचे म्हणणे सरकारने तात्काळ ऐकूण वाचनालये सुरू करण्याचा निर्णय घेतला!आहे! चला उद्यापासून वाचनालय सुरू होत आहेत!







