धरणगाव तालुका क्रिडा संकुल खेळाडू साठी लवकर सुरू होणार – पी एम पाटील

dharangaon-krida-sankul

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव तालुका क्रिडा संकुल सन 1991 पासून मंजूर असून आज तागायत त्याचा वापर खेळाडू साठी होऊ शकत नाही ही अतीशय दुर्देवी बाब आहे. ते लवकरात लवकर खेळाडूसाठी उपलब्ध केले जाईल अशी माहिती माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी दिली.

 

 

 

अनेक वर्षां पासून निधी अभावी असेल किंवा इतर काही अडचणी असतील त्यामुळे क्रीडा संकुल मंजूर होऊन सुद्धा ते जर कोणाच्याही वापरासाठी उपलब्ध होऊ शकत नसेल तर त्याचा काय उपयोग त्या क्रीडा संकुलाचा वापर कसा होतो काय होतो हे धरणगाव तालुक्याला माहिती आहे एक हॉल व वॉल कंपाऊंड फक्त एवढेच काम झाले असून एक कोटी रुपये क्रीडा संकुल साठी मंजूर झाले होते त्यापैकी 95 लाख रुपये खर्च झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

 

त्यात 200 मीटरचा ट्रैक,संडास, बाथरूम,एक हॉल झालेला आहे तो सुद्धा बंद अवस्थेत त्या हॉलला दरवाजे खिडक्या नाहीत,200 मीटरचा ट्रैक सुद्धा वृक्ष वाढलेले आजच्या स्थितीत दिसून येत आहे. धरणगाव तालुका क्रीडा संकुल हे खेळाडूच्या वापरण्यास योग्य नसल्यामुळे तालुका क्रीडा समितीकडे ते वर्ग होऊ शकत नाही.

 

 

 

ठेकेदार सांगतो बिले बाकी आहेत त्यामुळे काम पूर्ण करू शकत नाही, खऱ्या अर्थाने ज्या अधिकाऱ्यांना या कडे लक्ष दयायला पाहिजे होते त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नाही त्यामुळे त्या ठिकाणी चोर्‍या होत आहेत,गैरवापर होत आहे,वॉल कंपाऊंडचे ग्रील कापून घेतले गेलेत आतातरी संबंधितांनी त्याकडे लक्ष दयावे. धरणगाव तालुका क्रीडा संकुल विकासा साठी लवकरच स्थानिक समिती स्थापन करण्यात येऊन लवकरात लवकर मा.ना.पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांची भेट घेण्यात येऊन एका महिन्याच्या आत कामाला सुरुवात केली जाईल असे आश्वासन पी एम पाटील सर यांनी दिले असून त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here