बेड असिस्टंट हा कुटुंबातीलच असावा- जळगाव कोविड केअर युनिट ची मागणी

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कोविड केअर युनिट तर्फे माननीय जिल्हाधिकारी जळगाव, अधिष्ठाता शासकीय महाविद्यालय जळगाव, आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांना दोन विविध पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे की, बेड असिस्टंट हा कुटुंबातील सदस्य असावा कारण कुटुंबातील सदस्य हा ज्या तळमळीने आपल्या रुग्णाची सेवा करेल तशी सेवा समाजसेवक करू शकत नाही कारण रुग्ण हा पुरुष व महिला असल्याने टॉयलेट, बाथरूम असो अथवा वेळेवर औषध देणे असो, कपडे बदलणे असो किंवा कपडे मध्ये जर घाण झाली असेल तर ती सफाई करणे असो ते सर्व कार्य हा फक्त कुटुंबातील सदस्य करू शकतो त्यामुळे कुटुंबातील सदस्य ला बेड असिस्टंट म्हणून सेवेची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
सर्वेक्षण व वैद्यकीय शिबीराचा अहवाल सादर
जळगाव शहरात १० तर ग्रामीण भागात नशिराबाद व पाळधी येथे दोन अशे एकूण १२ कोविड केअर मेडिकल कॅम्प घेण्यात आले असून त्यात ४५६६१ नागरिकांचे सर्वेक्षण तर ७५९३ लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यात एकूण ३४ रुग्ण हे संशयास्पद आढळून आल्याने त्यांचे एक्स-रे करून त्यांच्यावर काही प्रमाणात खाजगी डॉक्‍टरांकडे उपचार करून औशोधपचार केले तर त्यापैकी १२ लोकांना कोविड सेंटर येथे पुढील औषधोपचारासाठी पाठवण्यात आलेअशाप्रकारे तेरा कॅम्प द्वारे ही कारवाई करण्यात आली. या साठी एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांची औषधे मोफत रुग्णांना वाटण्यात आली.
औषधोपचारासाठी मजीद राणानी, गुलाब बागवान, हाजी गफ्फार मलिक, युसुफ मकरा, डॉ अमनुल्लाह शाह, सैयद रहेमतूल्लाह,जफर शेख, साहिल पटेल, जाबीर मन्सूर, हाजी मुख्तार व महेमुद मेकॅनिक, नशिराबाद,हाजी अनिस अहेमद, हबीब इंजिनिअर,अनवर सिकलगर, नदीम मिर्झा, अझीम रफिक,मोहम्मद चौधरी,नगरसेवक चेतन संकत, नवनाथ दारकुंडे नगरसेविका रेश्मा कुंदन काळे तसेच जळगाव जिल्हा मानियार बिरादरी व वाहिदत ए इस्लामी या दोन संघटना यांनी सहकार्य केले. आवश्यकतेनुसार सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिराचे कार्य सुरू ठेवणार असल्याचे मुफ्ती अतिकुर रहेमान,अध्यक्ष गफ्फार मलिक,समन्वयक डॉक्टर जावेद शेख, जनसंपर्क प्रमुख फारुक शेख व रियाझ बागवान यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here