
अलिबाग (अब्दुल मुल्ला – सोगावकर) – आज महाराष्ट्र रूग्ण हक्क परिषदेच्या वतीने डॉक्टर्स डे अलिबाग येथे साजरा करण्यात आला आहे. यावेळी कोविड19 च्या महामारीत उल्लेखनीय व कोविड योद्धा म्हणून जीवाची पर्वा न करता अहोरात्र कामगिरी करणाऱ्या अलिबाग जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन, डॉक्टर, परिचारिका,वॉर्ड बॉय,सफाई कामगार,108 रुग्णवाहिका चालक,जिल्हा रुग्णालयातील बंदोबस्तात नेहमीच अग्रेसर असणारे पोलीस व अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये के.डी. कोल्हे व त्यांचे सहकारी यांचा महाराष्ट्र रूग्ण हक्क परिषदेचे प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण माध्यमातून रायगड जिल्हा रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष व सदस्य यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या,यावेळी धनंजय प्रभाकर म्हात्रे – रायगड जिल्हा अध्यक्ष व मुख्य समन्वयक,पत्रकार अब्दुल मुल्ला(सोगावकर) रायगड जिल्हा समन्वयक, तसेच भरतशेठ जैन, समीर पालकर, किशोर म्हात्रे आदी उपस्थित होते.








