जळगाव कोविड केअर युनिटतर्फे डॉ थत्ते,डॉ बाविस्कर,डॉ चौधरी व डॉ पंडित यांचा गौरव

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – शहर हा कोविड19 चा हॉटस्पॉट असतांना सुद्धा या ठिकाणी जे फिजिशन आपले जीव धोक्यात घालून रुग्णाची सेवा फक्त आपले कर्तव्य म्हणून न निभवता माणुसकी म्हणून निभावीत आहे व मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करीत आहे अशा या खऱ्या योध्दा डॉक्टर च्या घरी जळगाव कोविड केअर चे मुख्य मार्गदर्शक जळगाव शहराचे काझी मुफ्ती अतिकउर रहेमान,मुख्य समनव्यक डॉ जावेद शेख,जनसंपर्क प्रमुख फारूक शेख,संचालक अनिस शाह व अख्तर पिंजारी यांनी त्यांच्या निवास्थानि/क्लिनिक ला जाऊन त्यांचे आभार मानून ऋणात राहण्याचे आश्वसित करून त्यांना APRECIATION CERTIFICATE व पुष्प देऊन गौरव केला.
यात प्रामुख्याने आमचे शहराचे सर्वात सिनिअर डॉ सुनील थत्ते सर, डॉ परीक्षित बाविस्कर सर,डॉ सुयोग चौधरी सर व डॉ मंधान पंडित सर यांचा समावेश होता. हे सर्व डॉक्टर आपला धर्म फक्त डॉक्टर हाच आहे याला अनुसरून कार्य करीत असल्याने अल्पसंख्याक समाजाच्या 33 संघटनांनी एकत्रित येऊन जलगाव कोविड केअर युनिट ची स्थापना केली असून त्यांनी हा गौरव केलेला आहे म्हणून यास एक वेगळ्या दृष्टीकोणातून बघितले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here