तीन मोटरसायकलीसह चोरट्यास अटक; चोपडा पोलिसांची कारवाई

chopada-police

चोपडा (तालुका प्रतिनिधी संदिप ओली) – शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक संशयित व्यक्ती चोपडा शिवारातील हतनुर पाटचारीजवळ चोरीची मोटरसायकल घेवुन फिरत असल्याचे समजले.

 

 

त्याकरीता पुढील कारवाईकरीता पोलिस कर्मचार्यांना सदर ठिकाणी पाठवले असता संशयित सुरेश राजाराम बारेला,वय 20 ,रा.देवली दुगानी,ता.सेंधवा जा.बडवाणी (मध्यप्रदेश )त्याचेजवळ हिरो होंडा कंपनीची मोटरसायाकल मिळुन आल्याने त्याला चौकशीकरीता ताब्यात घेतले असता त्याच्याकडून रुपये १२५०००/-किंमतीच्या एकूण तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या.

 

 

आरोपीस अटक करुन सी.आर.पी.सी ४१(१)(ड)प्रमाणे कारवाई करण्यात आली.सदर कारवाई पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे,अपर पोलिस अधिक्षक सचिन गोरे व सहा.पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ.सुनिल पाटील,पो.ना.संतोष पारधी,पो.ना.ज्ञानेश्वर जवागे,पो.ना.जयदिप राजपूत,पोकॉ.रविंद्र पाटील यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here