कुही तालुक्यातील शिक्षकांची कोरोना सर्वेक्षणातून मुक्त करण्याची मागणी

kuhi-tahsil

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – ज्या शिक्षकांच्या सेवा कोरोनाच्या आजारासंबधीत कामकाजासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत . त्यांना कार्यमुक्त करण्यासाठी शासनाने संदर्भाकीत शासन परिपत्रक निर्गमीत केले असतांना कुही तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या कामकाजातून अजुनपर्यंत कार्यमुक्त केले नाही .

 

 

 

विद्यार्थ्यांना आॅनलाईनशिक्षण देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे शासनाचे आदेश असताना कुही तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दोन दोन कामे करावे लागत असल्याची तक्रार विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपूर ( ग्रामीण ) जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे यांच्या कडे दाखल केली .vardha-kuhi

 

 

 

जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे यांच्या नेतृत्वात गुरूवार १५ ऑक्टोंबर रोजी तहसीलदार कुही यांच्या सोबत चर्चा करून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे कोरोना सर्वेक्षणाच्या कामातुन मुक्तता करा अशी निवेदनाद्वारे मागणी केली .

 

 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विष्णु राणे , सहकार्यवाह विजय गोमकर , जिल्हा संघटक दत्तराज उमाळे , शंकर पन्नासे , श्री प्रकाश भोयर , श्री राजेंद्र भोयर , , माैंदेकर सर , गंथाडे सर , डडमल सर ,तितरमारे सर , वैद्य सर , कोत्तावार सर , गुरूनुले सर ,किशोर चालखोर, नारनवरे सर , दिगांबर नरूले , कहालकर सर , नरेंद्र पिंपरे सर वंजारी मॅडम , आदी सह सर्व शाळेतील असंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .vardha-teachers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here