चोपडा (नंदलाल मराठे)- लोकशाही व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ हा पत्रकार असतो असे म्हटले जाते. याचा अर्थ लोकशाही शासनातील कायदेमंडळ,कार्यकारणी आणि न्यायमंडळ या तीन शासन विभागा बरोबरच शासनावर जनतेच्या वतीने बाजू मांडणारे प्रसार माध्यम म्हणजे वृत्तसंस्था हा महत्वपूर्ण घटक आहे.व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य,समता,बंधुता या सामाजिक न्यायाच्या संकल्पना जनमाणसात रुजवण्यासाठी,कायद्याचे सामाजीकरण करण्यासाठी आणि जनहित व लोककल्याणच्या संरक्षणसाठी जनसामान्यामध्ये जाणीव जागृती करण्याचे काम आज वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे करीत आहे.सध्या राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्याच्या नियुक्तीच्या प्रक्रिया सुरू आहे.घटनेतील कलम १७१(५)नुसार राज्यपालांच्या कोट्यातून साहित्य,विज्ञान,कला, पत्रकारिता,सामाजिक कार्य आदी क्षेत्रातील लोकांची नियुक्ती करण्याची तजवीज आहे.राज्यपाल विधान परिषदेवर असे १२ सदस्य नियुक्त करू शकतात.
राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीत पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी चोपडा येथील पत्रकार तथा खान्देश अस्मिता चे संपादक नंदलाल मराठे यांनी केली आहे. राज्यपालांनी विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी दिल्यास ग्रामीण व शहरी पत्रकारांना नक्कीच न्याय मिळेल. पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून विनोद पत्रे हे पत्रकाराच्या न्याय व हक्कासाठी मागील १० ते १२ वर्षापासुन अहोरात्र झटत आहे.त्यांनी धरणे आंदोलन,उपोषणे केली आहेत पत्रकारितेत ते पदवीधर पत्रकार असून, पत्रकारातून आमदार म्हणून संधी दिल्यास सरकार कडुन पत्रकाराच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांचे सर्वप्रकारचे प्नश्न,पत्रकारांवरील हल्ले,पत्रकार संरक्षण कायदा ते राज्यात प्रभावीपणे अंमलात आणू शकतात त्यामुळे विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर पत्रकारांमधून संधी द्यावी अशी मागणी नंदलाल मराठे यांनी केली आहे.
Home Uncategorized विधानपरिषदेवर पत्रकार प्रतिनिधी म्हणून पत्रकार संरक्षण समितीचे विनोद पत्रेंना संधी द्या :...







