चोपडा (रविंद्र पाटील) – इयत्ता दहावी व बारावी च्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचीं ऐन वेळेस घाबरगूंडी उडू नये या साठी महत्वपुर्ण कागद पत्राची जमवाजमव करून घ्यावयाची आहे . तरी तशी पुर्व तयारी विद्यार्थ्यांनी करून घ्यावी.
या महिन्यात इ.दहावी व बारावी चे निकाल लागण्याची शक्यता आहे. (COVID 19) अर्थात कोरोना च्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्ष सुरु होणार यापूर्वीच खुप उशीर झाला आहे. तसेच हे संकट अजूनही संपलेले नाही. अशावेळी निकाल लागताच नवीन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल. अशा वेळी आपली योग्य ती सर्व कागदपत्रे आपल्याकडे तयार असणे फार महत्वाचे राहील .
अशा वेळी इकडेतिकडे आपली व पालकांची पळापळ होवू नये . या करीता प्रशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी जावून कामे उरकून घ्यावीत .कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे प्रशासनाने सावधनता म्हणून मोजकेच कर्मचारी कामकाजासाठी कार्यालयीन राहण्याचा बंधन ठेवले आहे . याचा परिणाम कामांवर होत आहे .कर्मचां-यांचा तुटवडा असल्याने आधीच आपले काम करून घेणे हिताचे राहील . य़ा परिस्थितीत विद्यार्थ्यांची व पालकांची घालमेल होवू नाही याकरीता .वेळेवर महत्वाचे कामे करून घेणेच अती जरूरीचे आहे. नविन प्रवेश घेण्यासाठी खालील कागदांची संबंधीत कार्यालयांकडून अथवा आँनलाईन स्थळावरून कागदपत्रांची पुर्तता करून घ्यावी हिच वेळेची समय सुचकता राहील व शैक्षणिक नुकसान पण होण्यांच्या संभावना टाळता येतील.
नवीन प्रवेश घेतेवेळी लागणारी कागदपत्रे – १.शाळा सोडलेचा दाखला, २.मागील वर्षाचे गुणपत्रक ३.जातीचा दाखला (आरक्षणाच्या लाभासाठी), ४.जात पडताळणी (आरक्षणाच्या लाभासाठी), ५.नॉनक्रिमिलेअर (फी माफीसाठी) , ६.डोमासाईल (महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षे रहिवासाचा पुरावा), ७.डोंगरी दाखला (मेडिकल प्रवेशाच्या आरक्षणाच्या लाभासाठी), ८.उत्पन दाखला (फी माफीसाठी), ९.शेतकरी दाखला (B.Sc Agree प्रवेशाच्या आरक्षणाच्या लाभासाठी), १०.अल्पभूधारक शेतकरी दाखला (होस्टेलच्या फी माफीसाठी), ११. EWS प्रमाणपत्र (आरक्षणाच्या लाभासाठी)







