शेतकरी बिलाच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेचा ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

gulabrao-patil

धरणगांव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘स्वाक्षरी मोहिम’ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीपासून राबविण्यात येत आहे.या मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी असून, या मोहिमेला सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर आणि कामगार वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

 

 

 

आज (दि.१६) शेतकरी बिलाच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी केले. शेतकरी बिलाच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेला माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी भेट देवून स्वाक्षरी केली. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव डी जी पाटील तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी शहराध्यक्ष राजेंद्र न्यायदे ज्येष्ठ नेते सुरेश भागवत तालुका उपाध्यक्ष एरंडोल नगर उपाध्यक्ष योगेश महाजन चंदन पाटील सरचिटणीस विकास लांबोळे गोपाल पाटील युवक उपाध्यक्ष राहुल मराठे नंदा महाजन चंदू लांबोळे इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते

 

 

 

भाजपाने निवडणूकीच्या जाहिरनाम्यात दिलेले उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भावाचे आश्‍वासन याला पुर्णपणे हरताळ फासत कुठलही चर्चा न करता केवळ बहुमताच्या जोरावर तीन शेतकरी विरोधी काळे कायदे व विधेयक मंजुर केले आहेत.काळ्या कायद्याच्या माध्यमातून भाजप देशातील हरित क्रांती नष्ट करणार अशी शक्यता आहे.
कारण,अंबानी,अदानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींना फायदा होण्यासाठी व स्वतःचे हित साधण्यासाठी शेतकरी व शेतमजुरांचे स्वातंत्र्य हिरावणारे हे कायदे आहेत.या कायद्यांवर सर्वपक्षीय चर्चा अपेक्षीत होती.परंतु,ती झाली नाही.हे दुर्दैवी आहे.

 

 

 

महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,माजी प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण,वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने पारीत केलेले काळे कायदे महाराष्ट्र सरकार राबविणार नाही.ही काँग्रेसची भूमिका आहे.

 

 

शेती, शेतकरी व शेतमजुर विरोधी विधेयकांचा जाहीर निषेध करीत आहोत.याला पाठबळ म्हणून काँग्रेसच्या वतीने 2 ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत शेतकरी,शेतमजूर,बाजार समितीमधील दुकानदार आणि कामगार,कष्टकरी यांच्या हितासाठी सह्यांची मोहिम राबविण्यात येत आहे.या मोहिमेतून 2 कोटी सह्यांचे निवेदन तयार करण्यात येणार आहे.कोविडचे सर्व नियम व अटी पाळून गाव-खेडी,शहर,शेती येथे ही सह्यांची मोहिम राबविली जात आहे.सह्यांचे निवेदन हे जळगाव जिल्हा कमिटी मार्फत एकत्रित करून ते प्रदेश कमिटीकडे पाठविणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here