दिव्य मराठी विरोधातील गुन्हा तात्काळ मागे घेण्याबाबत दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशनच्या वतीने अप्पर तहसीलदाराना निवेदन

दोंडाईचा (संतोष कोळी) –संपूर्ण जगाच्या पाठीवर मानलेल्या पत्रकार हा जनतेसाठी अन्याय साठी,न्याय मिळवून देण्याचा आवाज उठवनेचा काम हे वृत्तपत्र मालक,चालक पत्रकार करत असतात. दैनिक दिव्य मराठीच्या औरंगाबाद आवृत्ती प्रमुखसह संपादक प्रकाशक वार्ताहर यांच्या विरोधात प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनातील त्रुटी दाखवून सर्वसामान्याच्या आरोग्याची काळजी केल्याने माध्यमांना दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
औरंगाबाद सायबर सेलने दिव्य मराठीचे संपादक प्रकाशक वार्ताहार यांच्याविरुद्ध विविध सहा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. ही लोकशाही आहे की आणीबाणीचा काळ आहे?असा प्रश्न आता यानिमित्ताने पत्रकारांसह सर्वसामान्य दिसुन येत आहे. सत्यता चव्हाट्यावर आणल्याने गुन्हे दाखल करून माध्यमांची गळचेपी करण्यात येत आहे .अशा प्रकारे गुन्हा दाखल करून माध्यमांचा आवाज बंद होणार नाही .दिव्य मराठी विरोधात केलेले हे कृत्य निंदनीय व निषेधार्ह आहे. या प्रकारचा दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशन व इलेक्ट्रॉनिक मिडिया त्रीव निषेध व विनंती करीत आहे. प्रशासनाने तातडीने दिव्य मराठी विरोधातील गुन्हा मागे घ्यावा अन्यथा न्यायासाठी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल.या बाबतचे निवेदन दिले.
यावेळी दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष कोळी, अध्यक्ष हिम्मत निकम, रविंद्र टाटीया, अनिल जाधव,पंकज पाटील, संजय पाटील,मयुर कोळी,प्रभाकर आडगाळे,अख्तर शहा,प्रविण वाडिले, महेश धनगर,सचिन गिरासे,महेंद्र जैन,सचिन पाटील,अॅड.संतोष भोई कायदेशीर सल्लागार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here