यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंके) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हिंदी अध्ययन मंडळ व धनाजी नाना महाविद्यालय स्नातकोत्तर हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष कला हिंदी विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर “हिंदी भाषा साहित्य में खानदेश का योगदान “या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सदर कार्यशाळेत बीज वक्ता प्रसिध्द गांधीवादी साहित्यिक डॉ विश्वास पाटील उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, हिंदी साहित्य विकासासाठी खानदेशात लोकसेवक मधुकरराव चौधरी हे सिरमोर आहे बाळासाहेबानी ” लोकल हिंदी ला ग्लोबल हिंदी बनवलं. फैजपुर कॉंग्रेस अधिवेशन एक साहित्य कृती आहे. त्यानी सांगितलं, साहित्य गंगा नदी प्रमाणे आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन कबचौउमवि चे प्र कुलसचिव डॉ बी व्ही पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी उद्घाटन पर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या कार्यशाळे द्वारे ऑनलाईन टीचीग साठी विद्यार्थ्यांसाठी ई कॅटेड तयार होईल. हिंदी अध्ययन मंडळ अध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी यांनी कार्यशाळेची भूमिका कथन करताना सांगितले की, हिंदी भाषा व साहित्यात खानदेशा ची भूमिका महत्त्वाची आहे. प्रसंगी साहित्यिक डॉ पीताम्बर सरोदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, हिंदी एक विचार संस्कृति मनोहारी भाषा आहे. डॉ तेजपाल चौधरी सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक यांनी विज्ञान सुविधा उपलब्ध असल्याने या ई कार्यशाळेच आयोजन करण्यात आले हे सांगितले. डॉ मधुकर खराटे यांनी लोकनेता बाळासाहेब मधुकरराव चौधरी याच्या कार्याचे महत्व विशद केले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षिय समारोत प्राचार्य डॉ पी. आर चौधरी यांनी युवा पिढीला हिंदी भाषेला सक्षम बनवण्याचे आवाहन केले व हिंदी भाषेतील लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी केलेल्या सप्तपदीचे महत्व विशद केले. 
प्रथम सत्रात डॉ हेमचद्र वैद्य राष्ट्रभाषा प्रचार समिति वर्धा सहाय्यक मंत्री यांनी लोकसेवक मधुकरराव चौधरी याच्या कार्याचे महत्व विशद केले. डॉ शंकर पुणताबेकर याच्या साहित्यावर डॉ ओमप्रकाश शर्मा पुणे यांनी डॉ मु .ब .शहा याच्या साहित्यावर प्रा सतीश पाटील डॉ तेजपाल चौधरी याच्या साहित्याचे महत्व डॉ पुरुषोत्तम पाटील जलगॉव डॉ पीताम्बर सरोदे याच्या साहित्यावर डॉ विजय लावणे डॉ विश्वास पाटील यांच्या साहित्यावर डॉ नवनाथ हराळे यांनी विचार व्यक्त केले.
कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल डॉ योगेश पाटील विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे डॉ अशोक तायडे शहादा प्रा स्वाती शेलार एरडोल तसेच विद्यार्थी नफीसा बोहरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व परिचय विभाग प्रमुख प्रा.डॉ कल्पना पाटील यांनी केला व कार्यशाळा आयोजनाचा उद्देश व्यक्त केला. कार्यशाळेत दोनशे सहभागी नी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी तापी परिसर विद्यामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.शिरीषदादा मधुकरराव चौधरी, आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ, उपाध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन श्री लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा.किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा.मुरलीधर तोताराम फिरके, प्रा.पी.एच राणे श्री. मिलिंदबापू वाघुळदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी ,उपप्राचार्य डॉ.अनिल सरोदे , उपप्राचार्य प्रा.दिलीप तायडे , उपप्राचार्य प्रा डॉ.उदय जगताप , उपप्राचार्य डॉ ए आय भंगाळे यांनी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. कार्यशाळा च्या यशस्वीतेसाठी डॉ हरीष तळेले, प्रा शुभांगी पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ईश्वर ठाकुर यांनी तर आभार प्रा. डॉ. विजय सोनजे यांनी व्यक्त केले.







