बीकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये दहा हजार जणांवर यशस्वीपणे उपचार

bkc-jambo-covid-center
  • आत्तापर्यंत नऊ हजार १४५ जणांना मिळाला डिस्चार्ज
  • महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले डॉक्टर व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे कौतुक
  • दाखल झालेला रुग्णांपैकी एकही रुग्णांचा मृत्यू नाही

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटर फेज वनमध्ये आतापर्यंत दहा हजार सतरा रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहे. त्यापैकी नऊ हजार १४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोविड सेंटरच्या या चांगल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दि.१७ ऑक्टोंबर २०२० रोजी बीकेसी जम्बो कोविड सेंटरला भेट देऊन डिस्चार्ज भेटलेल्या रुग्णांशी संवाद साधला.तसेच डॉक्टर,परिचारिका व संबंधित रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना भेटून त्यांचे कौतुक केले.

 

 

 

महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरच्या फेज वन सेंटरमध्ये आतापर्यंत दाखल झालेला रुग्णांपैकी एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही हे विशेष. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ही अभिमानास्पद बाब असून,या कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. डेरे यांच्या नेतृत्वातील संबंधित डॉक्टर व सर्व यंत्रणा चांगली काम करीत आहे.याबद्दल मी डॉ.डेरे व त्यांचे संपूर्ण डॉक्टर,परिचारिका व रुग्णालयीन कर्मचार्‍यांचे कौतुक करीत असल्याचे महापौर म्हणाल्या.

 

 

या ठिकाणी दोन हजार २६ बेड असून यामध्ये १०८ बेड हे आयसीयू आहे तर १२ बेड हे डायलिसिसचे आहे.या ठिकाणी २१३ डॉक्टर कार्यरत असून २०८ परिचारिका व २३२ वॉर्डबॉय चांगल्या रीतीने काम करत असल्याचे महापौर म्हणाल्या.तसेच बीकेसीमधील जम्बो कोविड सेंटर येथे बायोसेफ्टी तीन श्रेणीतील “व्हायरस चाचणी अद्यावत प्रयोगशाळा” (वायरस इम्मुनोलॉजी टेस्टिंग लॅब) कंटेनरमध्ये नव्याने स्थापन करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.

 

 

यापूर्वी येथील कोरोना रुग्णांचे नमुने बाहेर खासगी प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. आता या प्रयोगशाळेमध्ये कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधोपचारांच्या सर्वच तपासण्या या प्रयोगशाळेमध्ये होणार असल्याचे महापौर म्हणाल्या. अति जोखमीच्या करोना रुग्णांना “रेमडिसीवर” इंजेक्शन देण्यापूर्वी करण्यात येणारी “आयएएल सिक्स” ही तपासणीसुद्धा या प्रयोगशाळेमध्ये होणार असून पंधरा मिनिटात रुग्णाचा अहवाल आल्यानंतर त्याला इंजेक्शन द्यायची आवश्यकता आहे की नाही? याचा निर्णय डॉक्‍टरांना घेण्यास या रिपोर्टमुळे सुलभ होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच करोना रुग्णांसाठी करण्यात येणारी “डायमर” ही तपासणी सुद्धा या प्रयोगशाळेमध्ये होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. दिवसभरात चार हजार चाचण्यांचा अहवाल या प्रयोगशाळेच्या माध्यमांतून तात्काळ आपल्याला कळणार असल्याचे महापौरांनी सांगून सीएसआर फंडामधून महापालिकेला ही कंटेनरमधील प्रयोगशाळा प्राप्त झाली असल्याचे महापौरांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here