शनिवारी आढळले १३२ रूग्ण कोरोनाबाधित; एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.१७) सायंकाळी मिळाल्यानंतर जिल्ह्यात १३२ कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर २१८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली असून, एक रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आज आढळलेल्या १३२ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर – ४५, जळगाव ग्रामीण- ५, भुसावळ-३२, अमळनेर-१, चोपडा-६, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव-२, यावल-६, एरंडोल-०, जामनेर-१८, रावेर-६, पारोळा-०, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-१, बोदवड-१, इतर जिल्हा-१ असा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण ५१ हजार ८२९ कोरोनाबाधित आढळून आले असून त्यातील ४८ हजार ५७३ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.. दरम्यान, आज १ कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा १ हजार २३८ झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २ हजार ०१८ कोरोनाबाधित विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.







