चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – येथील आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर अंतर्गषात येणाऱ्या नागलवाडी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेची सुरुवात होऊन प्रथम टप्प्यात ९८ शासकीय कर्मचारी ,जि.प.शिक्षक तर दुसऱ्या टप्प्यात ९७ आश्रमशाळा शिक्षक ,शासकीय अधिकारी यांचे कॉविड १९ रॅपिड अँटीजन टेस्ट व आरटी-पीसीआर तपासणी शिबीर नुकतेच घेण्यात आले.
या तपासणी शिबिरात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आलेले नाही. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी , तहसीलदार,गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेंद्र पवार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ पंकज पाटील ,डॉ मयुर सोनवणे , किशोर सैंदाणे,नरेंद्रकुमार वाघ,मिलिंद पाटील,अरुणा सूर्यवंशी,सुनीता बारेला,कल्पना नेहेते, आशा स्वयंसेविका आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
वैजापूर आरोग्य केंद्राच्या विशेष कोव्हीड-१९ तपासणी पथकातील आरोग्य सेवक प्रशांत बोरसे कर्जाणे,देवझिरी आदिवासी भागातील पाड्यांचे उत्तम सर्व्हेक्षण करीत असून प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजेंद्र रनाळकर व महालॅब तंत्रज्ञ प्रमोद ठाकरे अविरतपणे गेल्या ३-४ महिन्यापासून स्वॅब घेण्याचे तसेच दिल्लीच्या आयसीएमआर पोर्टलवरील कोव्हीडविषयक माहिती भरण्याचे काम करीत आहेत.या सर्वांचे आरोग्यसेवेतील अनमोल योगदानाबद्दल वरिष्ठ अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.







