कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – मडिलगे (तालुका आजरा) येथील कुमारी अपूर्वा विष्णु आयवाळे (वय १९) या तरुणीने नीट परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. त्याबाबतची वर्दी संबंधित मुलीचे वडील विष्णू कोंडीबा आयवाळे यांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.







