कंगना राणावत विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल

kangana-ranavat

मुंबई (हितेश मिस्त्री) – कंगना राणावत विरोधात एफआयआर दाखल करा, असे आदेश वांद्रे कोर्टाने पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा कंगनावर आरोप आहे. आज कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चांडेल विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. १२४ अ सह विविध कलमांतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

 

 



कंगनाविरोधात वांद्रे कोर्टात दोघा व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

 

 



याचिकाकर्त्यांनी कोर्टात कंगनाचे काही ट्विट्स आणि तिच्या वक्तव्याचे व्हिडिओ सादर केले आहेत. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here