सारा अली खानच्या हटके लूकने केले नेटीझन्सचे मनोरंजन

sara-ali

मुंबई (जॉनी वाझ) – बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला पारंपरिक साडी आणि ड्रेस परिधान करणं अतिशय पसंत आहे. ही अभिनेत्री बहुतेकदा पारंपरिक वेशभूषेतच दिसते. एखादी मुलाखत असो किंवा कौटुंबिक कार्यक्रम सारा अली खानचे मोहक व सुंदर पारंपरिक अवतारातील फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. साराची स्टाइल अप्रतिमच आहे. अगदी कोणीही सहजरित्या तिची स्टाइल फॉलो करू शकतात.sara1

 

 

 


पण कधी- कधी अति स्टायलिश अवतार अभिनेत्रींना भारी पडतो, याची कित्येक उदाहरणे तुम्ही आतापर्यंत पाहिली असतील. असेच काहीसे सारासोबतही घडले आहे. साराने लाल रंग्याच्या स्टायलिश साडी लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहून नेटिझन्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.sara-ali-khan

 

 


सारा अली खाने एका मासिकाच्या फोटोशूटसाठी लाल रंगाची स्टायलिश साडी नेसली होती. साडीला युनिक पॉइंट रफल आणि टेल डिझाइन देण्यात आलं होतं. संपूर्ण साडीवर लाल, पिवळा आणि गुलाबी रंगाचे छोटे-छोटे रफल डिझाइन जोडण्यात आले आहे तर हेअर स्टाइल म्हणून तिला बॅक कॉम्ब करून मेसी लुक देण्यात आला होता. साराचा मेकअप न्यूड टोन स्टाइलमध्ये करण्यात आला होता. डोळे अधिक आकर्षक दिसावेत, यासाठी आइलाइनरच्या मदतीने हाइलाइट करण्यात आलं होतं.

 

 


सारा अली खानचे या स्टायलिश साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर नेटिझन्सनी लगेचच तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तिचा हा लुक लोकांना पसंत न आल्याचे त्यांनी केलेल्या कमेंट्सवरून दिसत होते. काही नेटिझन्सनी या अवताराची खिल्ली देखील उडवली. काही लोकांनी लाफिंग इमोजी पोस्ट करत साराचा हा लुक ‘नटराज पेन्सिल’ सारखा दिसत असल्याचे म्हटलं.sara2

 

 


साराने यापूर्वी साडीसह स्टायलिश प्रयोग केलेले आहेत. लाल रंगाची साडी नेसून तिनं एका वेडिंग रिसेप्शनमध्ये उपस्थिती दर्शवली होती. या साडीचे डिझाइन युनिक होतं. फ्युजन लुक असणाऱ्या या साडीमध्ये सोनेरी रंगाच्या चुडीदारचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here