पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – शिरूर,जि.पुणे येथील हनुमाननगर मित्र मंडळा व द्रस्ट ,शिरूर येथे गणपती व नवरात्र उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. कालपासून नवरात्र उत्सवास सुरवात झाली आहे. हनुमाननगर मित्र मंडळाचे व द्रस्ट सचिव, खजिदार व राष्ट्रवादी सोशल मीडियाचे प्रशांत पवार यांनी कोरोनाची संकट लक्षात मंडळीची २८ वर्ष पासुनची परंपरा सुरु ठेवत, यावर्षी नवरात्र उत्सव अगदी साध्यापणाने मंडळाच्या देवीची स्थापना स्वतःच्या घरात केली.
सद्यपरिस्थितीतील कोरोनाचे वातावरण पाहता, ही काळजी घेण्यात आली आहे. कारण नवरात्र उत्सव म्हटल्यावर नागरीक, लहान मुले , मोठ्या प्रमाणात जमा होतात, परंतु नागरीकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला, भाविकांना देवीचे दर्शन,आरती, हे व्हॉटस्ॲप ग्रुपच्या माध्यमातून केले जाते.
लॉकडाऊन कालावधीत प्रशांत पवार यांनी हनुमाननगर भागात जंतुनाक फवारणी, मास , कार्यसम्राट आमदार अशोकबापु पवार यांच्यातर्फे गरजु नागरीकांना अत्यावश्यक अन्न धान्य किट वाटप केले. प्रशांत पवार म्हणाले हनुमाननगर हे माझे कुटुंब आहे व त्याची काळजी घेणे माझी जबादारी आहे. शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया जबाबदारी निःस्वार्थीपणे करत आहे,आमचे दैवत.खासदार शरदचंद्र पवार यांचे कार्य पाहिल्यास आम्हाला समाजकार्य करण्याची ऊर्जा मिळते.
प्रशांत पवार यांनी असेही सांगितले की, शिरूर स्थानिक राजकारणाबाबत कोणताही निवडणुकीत सहभाग घेणार नाही व कोणाचा प्रचारही करणार नाही.







