पोलीस निरिक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या सूचना, दर्गा परिसराची केली पाहणी…
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद येथील सुप्रसिद्ध हजरत जर जरी जर बक्ष यांच्या 734 व्या उरूसास 24 ऑक्टूबर पासून सुरूवात होत असून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी कार्यक्रम पार पाडला जाणार असून दर्गा परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल्स 22 ते 30 ऑक्टूबर पर्यत बंद ठेवण्याचा सुचना पोलीस निरिक्षक एस.एम. मेहत्रे यांनी दुकानदारांना दिल्या आहेत.
खुलताबाद येथील जर जरी जर बक्ष यांच्या उरूसास देशभरातून लाखो भाविक येत असतात. पंरतू यंदाच्या वर्षी कोरोनामुळे उरूस भरणार नसल्याचे प्रशासन व दर्गा कमिटीने यापुर्वीच जाहीर केले असले तरी औरंगाबाद शहर व जिल्ह्यातुन भाविक येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खुलताबाद पोलीस प्रशासनाने दर्गा परिसरातील दुकाने व हॉटेल्स बंद ठेवण्यात येवून दर्गेकडे जाणारे सर्व रस्ते बैरीकेट्स लावून बंद केले जाणार आहेत. कुणालाही दर्गा परिसरात जाण्याची परवानगी नसून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक एस.एम. मेहत्रे यांनी दिली.
खुलताबाद येथील उरूस मैदान तसेच जर जरी जर बक्ष दर्गा परिसराची पाहणी करून दर्गा कमिटीचे अध्यक्ष फजीलत अहेमद , शरफोद्दीन रमजानी, माजी नगराध्यक्ष अॅड.कैसरोद्दीन, नगरसेवक मुनीबोद्दीन, प्रा.शेख हुस्नोद्दीन यांच्याशी चर्चा केली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व सुचनांचे पालन करावे लागणार असून कायदा व सुचनांचे उल्लघंन करणा-याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही शेवटी पो.नि. सीताराम मेहेत्रे यांनी सांगितले.







