विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर उद्या १९ ऑक्टोबर पासून पुणे,सोलपूर,सांगली व सातारामधील अतिवृष्टी भागाच्या दौ-यावर

pravin-darekar

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर उद्या १९ ऑक्टोबर पासून ते २२ ऑक्टोबर पर्यंत चार दिवस पुणे, सोलपूर सांगली व सातारा जिल्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या १९ ऑक्टोबरपासून ३ दिवसांचा अतिवृष्टीचा दौरा करणार आहेत. यामध्ये १९ ऑक्टोबर रोजीच्या पुणे,बारामती जिल्ह्याच्या दौ-यामध्ये विरोधी पक्ष नेते दरेकर हे फडणवीस यांच्या सोबत उपस्थित असतील.

 

 

१९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते २ वा. दरम्यान विरोधी पक्ष नेते दरेकर हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बारामती, कुरकुंभ्, दौंड, भिगवण इंदापूर, परंडा, टेंभुर्णी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करतील. त्यानंतर विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा सोलापूरचा दौरा सुरु होणार आहे. विरोधी पक्ष नेते दरेकर सायंकाळी ४ वाजता सोलापूर जिल्हायातील भंडीशेवगाव, ता.पंढरपूर येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करणार आहेत. तेथील शेतक-यांच्या बांधावर जाऊन तेथील शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५ वा. पंढरपूर येथील कुंभारघाटाजवळील भिंत कोसळून झालेल्या अपघातस्थळाची पहाणी करतील, तसेच या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांची सात्वंनपर भेट घेणार आहेत.

 

 

 

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर २० ऑक्टोबर रोजी सोलापूर व सांगली मधील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. सकाळी १० वाजता संगोगी (ब), ता. अक्कलकोट येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करण्यात येईल. सकाळी १०.३० वा. अंधेवाडीज, ता. अक्कलकोट येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करतील. त्यानंतर दुपारी १२ वा. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. दुपारी १२.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दरेकर यांची पत्रकार परिषद होणार आहे.

 

 

 

त्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर सांगली येथे पोहचणार असून दुपारी ३.३० वा. ता. जत मधील उमदी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी व नंतर सायंकाळी ४.३० वा बाळोवाडी ता.आटपाडी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करतील.

 

 

 

विरोधी पक्ष नेते दरेकर २१ ऑक्टोबर रोजी सांगली व सातारा जिल्हयातील अतिवृष्टी भागांचा दौरा करणार आहेत. सकाळी १० वाजता अनुसेमळा, माडगुले, तडवले, करगणी, बनपूरी, मिटकी तलाव, बाळेवाडी, करंजे येथील भागांना भेट देतील. दुपारी १२.३० वा पेड, ता. तासगाव येथे पेड, कत्तेएकंद येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करतील. दुपारी ३ वाजता सांगलीच्या जिल्हाधिकारी/कृषी अधीक्षक यांचे समवेत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३.३० वा.जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे दरेकर यांची पत्रकार परिषद होणार आहेत.
दरेकर २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सातारा जिल्ह्यातील रिटकवली येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करतील. सकाळी १० वा. सातारा ग्रामीण मधील कारीव, गाजवडी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी सातारा यांचे समवेत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी १२.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे दरेकर यांची पत्रकार परिषद घेणार आहेत.

 

 

 

दुपारी ३ वा. जि. सातारा येथील वाईमधील चिखली व मालतपूर येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करणार असून सायंकाळी ४ वाजता महाबळेश्वर ग्रामीण, जि. सातारा येथील आब्रळ व राजपुरी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here