यावल (प्रतिनिधी सुरेश पाटील) – तालुक्यातील म्हैसवाडी येथील रहिवासी धनसिंग अमृत चौधरी वय 55 यांचे 17 ऑक्टोबर शनिवार रोजी पुणे येथे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
धनसिंग चौधरी यांनी गरिबीतून शिक्षण घेऊन दोडे गुर्जर समाजात त्यांनी प्रथम आरटीओ म्हणून नोकरीत नियुक्ती झाल्याने समाजाचा मान वाढवला तसेच त्यांनी या पदाचा त्याग करून डॉक्टर म्हणून संमोहन द्वारे अनेकांना जीवनदान दिले अनेकांना यशस्वीतेचे मार्ग दाखविले चित्रपट निर्माते नट दिग्दर्शक म्हणूनही ही त्यांनी समाजामध्ये नाव लौकिक केले एवढेच नव्हे तर पुणे येथे दोडे गुजर समाजाचा देवा मंडळ संघटनेची अध्यक्षपदही भूषवले त्यांच्या पश्चात तीन भाऊ तीन बहिणी पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे







