धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव तालुका क्रीडा शिक्षकांची बैठक व क्रीडा संकुलाचे प्रत्यक्ष पाहणी सर्व क्रीडा शिक्षक व पदाधिकाऱ्यांनी केली. अनेक अडचणींमुळे व निधी अभावी जिल्ह्यातील क्रीडा संकुले अपूर्ण अवस्थेत आहेत.धरणगाव तालुका छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल एक कोटी खर्च करून सुद्धा 9 वर्षात खेळाडू साठी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमी व ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एकही क्रीडांगण व हॉल पूर्ण नाही दरवाजे नाही,संडास,बाथरूम,कपडे चेंज करण्याचे हॉल कोणतेही पूर्ण अवस्थेत नाही त्याच्या गैर वापर होत असल्यामुळे खऱ्या अर्थाने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाठपुरावा करायला पाहिजे होता.
या सर्व गोष्टी आता इतिहास जमा करून तात्काळ क्रीडागण कसे सुरु होईल या साठी सर्वांनी प्रयत्न करावेत. 5 लाख रुपये निधी शिल्लक आहे त्यामुळे 50 % खर्च केला तरी संकुल सुरू होऊन खेळाडूंना वापरता योग्य होईल. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून एका महिन्याच्या आत कामाला सुरुवात होईल
धरणगावातील क्रीडाप्रेमी व दानशूर व्यक्तींनी सुद्धा थोड्याफार प्रमाणात सहकार्य केल्यास छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल पूर्ण होईल व क्रीडागणाची पाहनी करताना मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर,भानुदास आप्पा विसावे,क्रीडा शिक्षक संघ सचिन एल सूर्यवंशी तालुका समन्वयक, संदेश महानुभाव युवा तालुका क्रीडा अध्यक्ष, व्ही पी महाले, आर बी महाले,कैलास माळी सर, के एस पाटील,एन वाय पाटील,फिलोप गावित,विकास शिरसाठ,जितेंद्र ओस्तवाल,हेमंत माळी,डी एन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.








