पालकमंत्री ना.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ

kolhapur

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – रविवारी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सानेगुरुजी वसाहत भागातील एकजुटी मंडळ, इंद्रप्रस्थनगर, शिवराम पोवार, काशीद कॉलोनी, राजोपाध्याय नगर, कृपासिंधुनगरी आणि लक्ष्मी बलवंतनगर येथील अंतर्गतरस्ते कामाचा शुभारंभ पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. kolhapur-road-opening

 

 

 

कोरोनाच्या या संकटामुळे काही काळ शहरातील विकास कामे करता येत नव्हती. करवीर निवासासनी आई अंबाबाईच्या कृपेने कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आपल्याला यश आले आहे. परंतु, जोपर्यंत यावर लस येत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील यांनी सांगितले.

 

 

यावेळी, महापौर निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, भिकाजी गावकर, बाबुराव भुरके, कुंडलिक साखळकर, हणमंत गणबावले, रंगराव ताटे, विनायक फाळके, किरण पाटील, मधुकर रामाने, सुवर्णा महादेव मोरे, माया तगारे, संध्या क्षीरसागर, उर्मिला सोनूर्लेकर, हेमंत जाधव, महेश सासणे, हिंदुराव पाटील, सुरेश सुर्वे, डी. डी पाटील, दिलीप कोंडेकर तसेच भागातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

 

 

kolhapur-satej-patil

 

 

 

kolhapur-road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here