नंदुरबार (प्रतिनिधी विजय पाटील) – मोफत बी-बियाणे योजनेचा लाभ रब्बी हंगामातही सुरु ठेवण्यासाठी शेतकर्यांकडून 8 हजार 750 रुपयांची लाच स्विकारतांना तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील आत्मा प्रकल्पात कार्यरत असलेल्या कंत्राटी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयांतर्गत आत्मा प्रकल्प कार्यालयातील कंत्राटी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लोकसेवक योगेश वामनराव भामरे याने 7 दिवसांपूर्वी तक्रारदाराकडे सर्व 16 शेतकर्यांचे प्रत्येकी 250 प्रमाणे 4 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
याप्रमाणे यातील तक्रारदार यांनी समृद्धी शेती उत्पादक गट पिंपरान पोस्ट पोटीबेडकी नवापूर जिल्हा नंदुरबार असा एकूण 16 शेतकऱ्यांचा गट कायदेशीर स्थापन करून रेजिस्टर केला. तक्रारदार हे नुमद गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या गटास बी बियाणे नि विष्टा शासनाकडून मोफत वाटप झालेले आहे व शेतात पेरणी देखील झाली आहे.
आत्मा प्रकल्प कार्यालय नवापूर येथील लोकसेवक योगेश वामनराव भामरे यांनी 7 दिवसांपूर्वी तक्रारदार यांच्या कडे सर्व 16 शेतकरी यांचे प्रत्येकी 250 ₹ प्रमाणे मिळून 4000 ₹ ची लाचेची मागणी केली होती व लाच न दिल्यास पुढील रब्बी सिजन मधील पिकांचे बी बियाणे मोफत मिळू देणार नाही असे सांगितले
पुढील रब्बी हंगामातील पिकांचे बी बियाणे मोफत मिळू देणार नाही असे सांगितले. तक्रारदारांनी तक्रार दिल्यानंतर दि.19 ऑक्टोबर 2020 पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक तक्रारदारांना 16 शेतकरी नसून 35 शेतकरी आहेत असे सांगून प्रत्येकी 250 प्रमाणे एकूण 8 हजार 750 लाचेची मागणी करून ती लाच पंच व साक्षीदारांसमक्ष नवापूर स्टेट बँक ऑफ इंडिया रोड वरील सार्वजनिक रस्त्यावर स्विकारली म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरिष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिरराव, हेकॉ उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, पोलीस नाईक दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली.







