जळगाव जिल्ह्यात १६९ कोरोनाबाधितांची कोरोनावर मात

corona-test

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९४.०३ टक्क्यांवर पोहचला
मात्र जळगाव शहरात रुग्णसंख्येत वाढ

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.१९) संध्याकाळी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार आज १६९ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे तर १५२ कोरोनाबाधित नव्याने आढळून आले आहेत. त्यात जळगाव शहरात सर्वाधिक ५७ रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

 

आज आढळलेल्या १५२ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर- ५७, जळगाव ग्रामीण- ७, भुसावळ-२४, अमळनेर-९, चोपडा-१४, पाचोरा-७, भडगाव-३, यावल-६, एरंडोल-१, जामनेर-८, रावेर-११, चाळीसगाव-३, बोदवड-२ असा समावेश असून, आज धरणगाव, पारोळा व मुक्ताईनगर तालुक्यात एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही.

 

 

 

आज १६९ कोरोनाबाधिंतांनी कोरोनावर मात केल्यानंतर कोरोनावर मात करणाऱ्यांची एकूण संख्या ४८ हजार ९३५ झाली असून, ३ कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या १ हजार २४४ झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here