भारतीय सौर २८ आश्विन शके १९४२, निज आश्विन शुक्ल चतुर्थी सकाळी ११.१८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: ज्येष्ठा उत्तररात्री २.११ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक उत्तररात्री २.११ पर्यंत, सूर्यनक्षत्र: चित्रा, सूर्योदय: सकाळी ६.३६, सूर्यास्त: सायं. ६.१०, चंद्रोदय: सकाळी १०.०५, चंद्रास्त: रात्री ९.३२.
आजचे शुभ मुहूर्त :
अभिजित मुहूर्त : सकाळी ११ वाजून ४३ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २८ मिनिटे.
विजय मुहूर्त : दुपारी ०१ वाजून ५९ मिनिटे ते ०२ वाजून ४५ मिनिटे.
निशिथ काळ : रात्रौ ११ वाजून ४१ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे.
अमृत काल : सकाळी ०६ वाजून ०१ मिनिट ते ०७ वाजून ३० मिनिटे.
रवि योग : रात्रौ ०२ वाजून १२ मिनिटे ते पहाटे ०६ वाजून २६ मिनिटे.
गोधुलि मुहूर्त : सायंकाळी ०५ वाजून ३५ मिनिटे ते ०५ वाजून ५९ मिनिटे.
आजचे अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी ०३ वाजेपासून ते ०४ वाजून ३० मिनिटे.
यमगंड : सकाळी ०९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटे.
गुलिक काळ : दुपारी १२ वाजेपासून ते ०१ वाजून ३० मिनिटे.
दिनविशेष: विनायक चतुर्थी (अंगारक योग), ललिता पंचमी.
राशिभविष्य
मेष : जोडीदाराच्या बोलक्या वृत्तीचा आपल्याला फायदा होईल. घरात शुभकार्य घडतील. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. आप्तेष्टांची एखादी कृती मन खिन्न करू शकेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळू शकतील. वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
वृषभ : उत्तम प्रशासक म्हणून लोक आपल्याला सन्मान देतील. छोट्या आजारांकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. शुभ योगाचा दिवस. मिळकतीच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न यशकारक ठरू शकतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. बोलताना तारतम्य ठेवावे. विरोधक पराभूत होतील. कार्यक्षेत्रातील वातावरण अनुकूल असेल.
मिथुन : आपणास सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. अति धाडसी साहस करू नका. ग्रहांची अनुकूलता लाभदायक ठरू शकेल. व्यवसायात प्रतिष्ठा वाढीस लागेल. एखादी भेटवस्तू, सन्मान मिळू शकतील. हाती घेतलेले कार्य यशस्वीपणे पार पडल्यामुळे प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. मित्रांची असलेले नाते घट्ट होईल. कोणावरही अंधविश्वास ठेऊ नये. सासरच्या मंडळींशी मतभेद शक्य.
कर्क : अविचाराने सट्टेबाजारात उतरू नका. आपली बाजू मांडून गैरसमज दूर करा. भाग्याची भक्कम साथ लाभेल. कोष वृद्धिंगत होण्याचे संकेत. वैवाहिक जीवन सुखमय असेल. धन, पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागू शकेल. एखादी घटना मन विचलित करू शकेल. परीक्षांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. विरोधक परास्त होतील. नोकरदार आणि व्यापारी वर्गाला दिलासादायक दिवस.
सिंह : अचानक प्रवास करावा लागेल. हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. आपला प्रभाव वाढेल. मान, सन्मान, भेटवस्तू मिळू शकेल. दुसऱ्याची मदत लाभेल. छोटे प्रवास लाभदायक ठरतील. प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकेल. आप्तेष्टांचे सहकार्य मोलाचे ठरेल. शुभवार्ता मिळू शकतील.
कन्या : नवीन उधारी देऊ नका. व्यवसायामध्ये कोणाच्याही बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. ग्रहमानाच्या अनुकूलतेमुळे भाग्याचे उत्तम पाठबळ मिळू शकेल. चांगल्या गोष्टींसाठी केलेला खर्च प्रसिद्ध मिळवून देऊ शकेल. आहारावर नियंत्रण ठेवावे. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकेल. विरोधक परास्त होतील. एकूणच आजचा दिवस शुभ ठरू शकेल.
तुळ : अति तिखट पदार्थांचे सेवन टाळा. शेती, जमीन संबंधीचे व्यवहार पूर्ण करा. आजचा दिवस विशेष ठरू शकेल. रोजगासाठी सुरू असलेले प्रयत्न सकारात्मकता प्रदान करतील. मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. प्रवास घडू शकेल. प्रिय व्यक्तीची भेट होण्याचे योग आहेत. जनसंपर्कात भर पडेल.
वृश्चिक : घरातील मोठ्या लोकांचा आदर करा. खेळ, स्पर्धा याच्यामध्ये यश मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही आणि आनंदी असेल. जोडीदाराशी असलेले नाते दृढ होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. मौल्यवान वस्तू प्राप्त होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात आवडत्या आणि रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
धनु : आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. नोकरी, व्यवसायात तुमच्या प्रगती प्रशंसा होईल. नियोजित कार्ये यशस्वीरित्या पूर्णत्वास जाऊ शकतील. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. मित्रही मदतीसाठी सरसावतील. आर्थिक पातळीवरील प्रयत्न सकारात्मकता प्रदान करू शकतील. गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल दिवस. मनोबल वाढीस लागेल.
मकर : जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांचा अभ्यासामध्ये उत्साह वाढेल. ग्रहांच्या अनुकूलकतेमुळे हाती घेतलेले काम यशस्वीरितीने पार पाडू शकाल. नियोजित कामे योग्य पद्धतीने होऊ शकतील. कार्यक्षेत्रात काही ना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. मनोरंजनाच्या संधी प्राप्त होऊ शकतील. विरोधक परास्त होतील.
कुंभ : हातात घेतलेले काम पूर्ण होईल. हातातला सोडून दुसरा व्यवसाय पकडू नका. चंद्राच्या प्रभावामुळे नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. आहारावर नियंत्रण ठेवावे. सासरच्या मंडळींकडून लाभ मिळू शकेल. कोणत्याही वादविवादापासून दूर राहावे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. योग्य ती काळजी घ्यावी.
मीन : शांत राहून कामे पूर्ण करा. सामाजितक क्षेत्रात आपले कौतुक होईल. आजचा दिवस शुभ असेल. मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढीस लागतील. रोजगार क्षेत्रातील प्रयत्न सकारात्मक ठरू शकतील. बोलताना तारतम्य ठेवावे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. मन प्रसन्न राहील. भाग्याची उत्तम साथ मिळू शकेल.
चौथी माळ : नवदुर्गेतील चौथे स्वरुप कूष्मांडा देवी

नवरात्रात दुर्गा देवीच्या नऊ रुपांना विशेष महत्त्व आहे. दुर्गा देवीच्या नऊ रुपांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते. नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव. शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष ठरतो. नवरात्रातील चौथा दिवस कूष्मांडा देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे चौथे स्वरुप असलेली कूष्मांडा देवी अष्टभुजा आहे. देवीने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे. कूष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे.
सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कूष्मांडा स्वरुपाच्या पूजनाचा संकल्प करावा. यथाशक्ती, आपापल्या पद्धती, परंपरांनुसार देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जुन वहावे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. कूष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये दही, साखर फुटाणा असल्यास उत्तम, असे सांगितले जाते.
कूष्मांडा देवीचा मंत्र
कूष्मांडा देवीचे पूजन करताना तसेच पूजनानंतर पुढील मंत्र म्हणावा. शक्य असल्यास यथाशक्ती जप करावा.
ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥
या देवी सर्वभूतेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
दुर्गा देवीच्या चौथ्या स्वरुपाचे नाव कूष्मांडा आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कूष्मांडा देवी असे म्हटले जाते. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कूष्मांडा देवीची पूजा, उपासना करावी, असे सांगितले जाते. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. कूष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कूष्मांडा देवीची उपासना मनु्ष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.







