आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते माऊली महिला बचत गटाचे धनादेश वाटप

mauli-mahila-bachat-gat

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – मंगला नायकवडी यांनी कोरोनाच्या काळात यशस्वीपणे बचतगटाची धुरा सांभाळण्याने माऊली महिला बचत गटाने दुसऱ्यादा पाच वर्षाचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण केला असून १००% कर्ज वसुली करण्यात आली आहे.

 

 

 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी वर्षा झिमल, वंदना यादव, सुमन उतेकर, प्रिती शिरोडे, कामाक्षी अडसूळ, गायत्री सावंत, लक्ष्मी चांदगुडे, सविता विचारे, दुर्वा पारकर, वंदना गलांडे आणि अन्य महिलांना धनादेश वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here