कल्याण (विशेष प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळात कारखाने,उद्योग,व्यापार,व्यवसाय,रोजगार, नोकरी,वाहतुक सर्वकाही ठप्प झाल्यामुळे अर्थचक्र थांबलं त्यामुळे देशाचा जीडीपी कधी नव्हे इतका मायनस 21पाँईंंट समथिंग पर्यंत घसरला.पण अशा परिस्थितीत समस्त देशबांधवांना पुरेसं आणि वाजवी दरात अन्नधान्ये, कळधान्ये, तृणधान्ये, तेलबिया, पालेभाज्या, फळभाज्या व फळे पुरविणारा अन्नदाता म्हणजे शेतकरी राजा होय.पण त्याची व्यथा आणि कथा कुणाच्याही ध्यानीमनी नाही.आपण विज्ञान व तंत्रज्ञानात कितीही प्रगती केली,आकाशाला गवसणी घातली तरी कृषीक्रांती घडवून आणणेसाठी जलक्रांती शिवाय तरणोपाय नाही…! उत्तर महाराष्ट्र जलपरिषद करीत असलेल्या कार्याबद्दल गौरोद्गार काढून सर्वांनी एकत्र येऊन कामकरण्याची गरज आहे असे प्रतिपादन पद्मश्री, खान्देशभूषण निलीमाताई मिश्रा यांनी केले.
जल हे परीस आहे.जल हेच जीवन.जल हेच खरं द्रवरुप सोनं.अशा जलाचं संक्रमण,संरक्षण आणि संवर्धन करणेसाठी उत्तर महाराष्ट्र जलपरीषदेने कंबर कसली आहे जनतेने स्वयंस्फुर्तीने या जनहितार्थ, जनचळवळीत सहभागी व्हावे…! – कार्याध्यक्ष,बापुसाहेब हाटकर.
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचालित उत्तर महाराष्ट्र जलपरीषद हे केवळ आणि केवळ पाणी आणि पाणी या विषयांवरच काम करणारं समर्पित संघटन आहे.ह्या संघटनेची उतरंड वा ढाचा सहास्तरीय आहे. राज्यक्षेत्र, लोकसभाक्षेत्र, विधानसभाक्षेत्र, जिल्हा परीषदगटक्षेत्र,पंचायत समिती गणक्षेत्र व ग्रामपंचायत गावक्षेत्र कार्यकारिणी असा असून प्रत्येक कार्यकारिणी किमान १५ जलयोध्यांची असावी.ग्रामपंचायतक्षेत्र अध्यक्ष हा पं.स.गणक्षेत्राचा,पंचायत समिती गणक्षेत्राचा अध्यक्ष हा जि.प.गटक्षेत्राचा,जिल्हा परिषद गटक्षेत्राचा अध्यक्ष हा विधानसभा क्षेत्राचा,विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष हा लोकसभा क्षेत्राचा तर लोकसभा क्षेत्राचा अध्यक्ष हा राज्यक्षेत्र कार्यकारिणीचा पदसिद्ध सदस्य असेल.राज्य क्षेत्र कार्यकारिणी ही शिखर कार्यकारिणी असल्यामुळे तिने सर्वसहमतीने, सर्वसंमतीने आणि सर्वानुमते घेतलेले सर्व निर्णय सर्व कार्यकारिणींसाठी बंधनकारक असतील.
जलक्रांतीमुळेच कृषीक्रांती,हरीतक्रांती,दुग्धक्रांती,औद्योगिक क्रांती व रोजगार क्रांती आपसूकच घडून येणार आहे.कारण सर्व क्रांत्याचा मुलाधार आहे जलक्रांती. जलक्रांतीच्या माध्यमातूनच उत्तर महाराष्ट्र हा सुजलाम्,सुफलाम् होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.सरकारकडून आम्हांला कर्ज नको की कर्जमाफी नको,अनुदान नको की कर्जमुक्ती नको…फक्त हवं आहे 24 तास शेती,उद्योग व पिण्यासाठी जलव्यवस्था…! – अध्यक्ष,विकास पाटील.
उत्तर महाराष्ट्रात ८ लोकसभा,४८ विधान सभा तसेच जि.प.गट,पं.स.गण आणि ग्रामपंचायतींचं नेटवर्क हेच आपलं खरं नेटवर्थ ठरणार आहे.त्यामुळे आपल्या जलसंघटनेचं मजबुतीकरण,सक्षमीकरण,
समृध्दीकरण आणि विस्तारीकरण करणेसाठी पुरेसा वाव आहे. जात,धर्म,पंथ,पद,पक्ष विरहित जनचळवळ उभारणीचा संकल्प केल्यामुळे स्किलबेस्ड आणि नॉलेजबेस्ड लिडरशीप तयार होईल आणि त्यामुळेच भक्कम पायाभरणी होणार आहे.आपल्या एकमेकांविषयीची अभंग निष्ठा,अढळ श्रध्दा,असीम त्याग, अफाट कष्ट,अखंड उत्साह,अतुट विश्वास,अपार समर्पण,अभेद्य जिद्द,अवीट गोडी आणि अमीट ठसा हीच आपली खरी वर्कबँक आहे…!या जनचळवळीला प्रत्येक क्षेत्रातुन खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे असे सचिव दिपक पाटील व कोषाध्यक्ष ए.जी. आप्पा यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्रात जलक्रांती,जलसमृध्दी आणि जलसंस्कृती घडवून आणणेसाठी जनजागृती, जनसंवाद,जनसंपर्क, जनआंदोलन,जनप्रबोधनाद्वारे जनचळवळ उभी करणे हाच उत्तर महाराष्ट्र जलपरीषदेच्या स्थापनेमागचा मुळ उद्देश आहे…! – कार्यवाह,एन.एम.भामरे.
आजच्या सभेप्रसंगी श्री विश्वास देवरे,श्री अनिल निकम, श्री मगन सुर्यवंशी, श्री विश्वास भोसले,श्री विश्वास भाऊ पाटील, श्रीविनोद भानुशाली,श्री दिलीप सोनवणे, प्रा.प्रकाश माळी प्रा जि.ओ.माळी,श्री किशोर पाटील, सुभाष सरोदे यांची लक्षवेधी उपस्थिती होती.उत्तर महाराष्ट्र जलपरीषदेचे नवनियुक्त लोकसभा क्षेत्राध्यक्ष मा.श्री.विनय सावंत(शिर्डी),मा.श्री.बाळासाहेब वाघ(नाशिक),मा.श्री.भाऊसाहेब पगार(दिंडोरी),मा.श्री.कैलास अहिरे(धुळे),मा.श्री.नरेंद्र पाटील(जळगांव), मा.श्री.जितेंद्र महाजन(रावेर),मा.श्री.विरेंद्र वळवी(नंदुरबार) ही मंडळी म्हणजे अष्टप्रधान मंडळच.त्यांचा गाढा अभ्यास,सखोल ज्ञान,प्रदीर्घ अनुभव,विशाल ह्रदयी नेतृत्व,व्यासंगी वक्तृत्व,सर्जनशील कर्तृत्व आणि दूरदृष्टी हीच खरं संघटनेची लांबपल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत.जी लक्षभेद केल्याशिवाय थांबणार नाहीत आणि त्यामुळेच इतरांनाही प्रेरणा,उमेद,उत्साह व उर्जा मिळेल…! आजची परीषदेची सहविचारसभा ही विचारमंथनच नव्हे तर चिंतनसभाच ठरली.सर्व उपस्थितांचे आभार महिलाआघाडी प्रमुख सौ.सुनिता बोरसे यांनी व्यक्त केले.







