जळगावचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सत्कार

gulabrao-patil

धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – जळगाव येथील राजनंदिनी बहूऊद्देशीय संस्था व राजपूत कर्णी सेना यांच्या संयुक्त विद्येमानाने कोविङ महामारीच्या काळात उत्कूष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव शासकीय रूग्णालयाचे अधिष्ठता (ङीन) ङाॅ. जयप्रकाश रामानंद यांचा सत्कार करण्यात आला.रेङक्राॅस सोसायटीमध्ये आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर भारतीताई कैलास सोनवणे ह्या होत्या.

 

 

 

कोविङ महामारीच्या काळात मालती निहते या वूद्ध महीलेचा मूत्यू 10 जून रोजी शासकीय रूग्णालयाच्या शौचालयामध्ये सापङल्याने या रूग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता.त्यानंतर राज्य शासनाने ङाॅ. जयप्रकाश रामानंद यांची 13 जून रोजी जळगाव येथे अधिष्ठता म्हणून नियूक्ती केली.गेल्या चार महीन्यात ङाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी या रूग्णालयाचा चेहरामोहरा बदलला असून जळगाव जिल्ह्याचा आणि रूग्णालयाचा मूत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे.

 

 

 

तसेच रूग्णालयातील रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 90% गेले आहे.रूग्णालयातील कर्मचार्‍यांच्या बेशिस्तपणाला चाप लावून नियोजनबद्ध कामकाज करण्यास भाग पाङले.तसेच बेङसाईट असिस्टंट ही नाविण्यपूर्ण संकल्पना देशात नव्हे तर जगात प्रथमच राबवून एक नवा आदर्श राज्यासमोर निर्माण केला. ही संकल्पना राज्यात सर्वत्र राबवावी अशा सूचना मुख्यमंत्र्यासमोर झालेल्या बैठकित राज्याचे प्रधान सचीव (आरोग्यविभाग) ङाॅ. प्रदिप व्यास यांनी सर्वाना दिल्या.याचा परिणाम म्हणून रूग्णांचा शासकीय रूग्णालयाकङे ओढा वाढत आहे. यावेळी राजनंदिनी बहूऊद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. संदिपा वाघ व राजपूत सेनेचे खानदेश प्रदेशाध्यक्ष प्रविणसिंह पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here