मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

sambhaji-bigrade

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – रविवार (दि.१८) रोजी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे कोकण विभाग व रायगड जिल्हा उत्तरतर्फे प्रशिक्षण शिबिर व जिल्हा कार्यकारणी नियुक्ती उपक्रम कराडी समाज हॉल कामोठे येथे संपन्न झाला.

 

 

 

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व कोकण प्रदेश अध्यक्ष शिवश्री सचिन जगदीश सावंत देसाई यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा उत्तर पदाधिकारी नियुक्ती खालील प्रमाणे देण्यात आली.
कार्यक्रमात शिवश्री जगदीश ठाकरे यांचे कोकण विभाग कार्याध्यक्ष पदी निवड तर जिल्हा उत्तर अध्यक्ष शिवश्री विश्वनाथ नारायण मगर यांची निवड करण्यात आली.sambhaji-bigrade

 

 

 

त्याचप्रमाणे शिवश्री सज्जन गवळी रायगड जिला उत्तर कार्याध्यक्ष, शिवश्री समीर म्हात्रे रायगड जिल्हा उत्तर उपाध्यक्ष, शिवश्री हेमंत पाटील रायगड जिल्हा उपाध्यक्ष, शिवश्री अनिरुद्ध जाधव जिल्हा कायदेशीर सल्लागार यांची जिल्ह्यावर निवड करण्यात आली.
त्याच प्रमाणे काही तालुका अध्यक्ष व तालुका कार्यकारणी यांचीसुद्धा निवड करण्यात आली, कर्जत तालुका अध्यक्ष म्हणून शिवश्री विशाल माळी, पनवेल तालुका अध्यक्ष शिवश्री सुरेश गायकवाड तसेच शिवश्री तानाजी माने यांची संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियन नवकार युनिट अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.sambhaji-bigrade

 

 

 

शिवश्री राकेश घरत संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियन सीबर्ड युनिट अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे रसायनी विभाग अध्यक्ष शिवश्री केदार शिंदे यांची निवड करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी खालील मान्यवर पूर्ण महाराष्ट्रातून आले होते शिवश्री प्रदीप कणसे महाराष्ट्र प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड, शिवश्री अनिल माने सोशल मीडिया प्रमुख संभाजी ब्रिगेड, शिवश्री सुभाष सावंत नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष, शिवश्री भूषण शिसोदे रायगड जिल्हा दक्षिण अध्यक्ष, शिवश्री सतीश पाटील जिल्हा कार्याध्यक्ष ठाणे, शिवश्री दीपक पहुरकर उपाध्यक्ष नवी मुंबई, शिवश्री अमित पद्माकर नवी मुंबई संघटक तसेच प्रमुख पाहुणे पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा श्री सिद्धार्थ जाधव यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली

 

 

 

तसेच सर्व कार्यकर्त्यांचे कार्यकर्त्यांच्या उपस्थित मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियन कोकण विभागीय कार्यालय उद्घाटन करण्यात आले. संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियन व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड एकत्रितपणे येत्या आठवड्याभरात सर्व कामगारांचे प्रश्न घेऊन सी बोर्ड लॉजिस्टिक कंपनी उरण येथे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here