बांभोरी बु. येथील मुलीवर अत्याचार करण्या-याला त्वरित अटक करा?

bambhori

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व शिवसेना महिला आघाडीची मागणी

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – तालुक्यातील बांभोरी बु. येथील एका शेत मालकाचा शेतामध्ये झोपडी बांधुन राहणा-या सालदाराची पिडीत मुलगी लहान वय – 5 वर्षे या मुलीवर, टेरु जमादार बारेला वय वर्षे 25 रा. मध्यप्रदेश या नराधमांने 8 ते 10 दिवसांपुर्वी पिडीतीचे आई वडील शेतात कामाला गेले असतांना अतिप्रसंग करुन अत्याचार केला. त्याला ताबडतोब अटक करावी अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व शिवसेना महिला आघाडी यांनी धरणगाव पोलिस निरीक्षक पवन देसले यांना आज निवेदन देण्यात आले.

 

 

 

ही घटना समाजाला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीला ताबडतोब अटक करून या चिमुरडीला न्याय द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे. आम्ही सर्व महिला गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय, साकेगाव ता. भुसावळ येथे जाऊन पिडीत मुलीची भेट घेतली असता समजले की, तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार झालेला आहे. म्हणून अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व शिवसेना महिला आघाडी आम्ही लेखी निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत की, सदर आरोपीवर आय पी सी कलम 376 सोबत फाॅस्को कायदा लावण्यात यावा तसेच हा खटला जलद गती (फाॅस्ट ट्रॅक) न्यायालयात चालवुन या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी व पिडीत मुलीला न्याय मिळावा अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जळगांव व शिवसेना महिला आघाडी धरणगाव यांनी केली आहे.

 

 

 

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जिल्हा अध्यक्ष सुचित्रा महाजन,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन, नगरसेवक विलास महाजन, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती चा उपाध्यक्ष मनिषा पाटील, सचिव पुष्पाताई पाटील, जनमत प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज नाले , सचिव हर्षा ढाके पाटील, शुभम पाटील, रोहण महाजन, विलास पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here