ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – काही दिवसांपूर्वी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस 24 तास झटणारे, गोरगरिबांना अन्नधान्याची मदत करणारे, पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यामध्ये कोणताही भेदभाव न करता प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांना मदतीचा हात देणारे, तहान भूक विसरून रेड झोन मध्ये प्रत्यक्ष उतरून काम करणारे प्रत्यक्षात स्वतः कोरोना पॉझिटिव्ह निघाले तरी सुद्धा त्यांनी कोरोनावर मात करून पुन्हा ठाणे पोलीस आयुक्त पदभार स्वीकारला. 
कोरोना मुक्त झाल्यावर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे जोमात स्वागत केले नेहमी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे आमचे ठाणे जिल्ह्याचे लाडके पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचा कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्र पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा गृहरक्षक दल संघर्ष समिती सिद्धार्थ डी जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच CP साहेबांचे रायटर API अजय घोसाळकर, परिमंडळ 5 वागळे स्टेट कार्यालयांमधील पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे व मपोहवा – ज्योती प्रमोद अनुसे , पोहवलदार अनिल बबन थोरात ,पोलीस नाईक रमेश खानझोडे, पोलीस नाईक नितीन रमेश पाटील, पोलीस शिपाई अशोक महादेव सूर्यवंशी, पोलीस शिपाई राहुल सुधाकर पाटील तसेच वर्तक नगर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक निकम यांना कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले.
तसेच वनविभागातील वन अधिकारी राजेंद्र पवार व त्यांच्या संपूर्ण वनरक्षक कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोना योद्धा ने सन्मानित करण्यात आले व कोरोणाच्या महामारीमध्ये पोलीस स्टेशन व गोरगरिबांना दोन ट्रक अन्नधान्य मदत करणारे सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक तथा चाटत अकाउंटंट सीए श्री शिव भगवान अासावा यांनासुद्धा सन्मानित करण्यात आले
संपूर्ण कोरोणा सन्मानपत्रचे नियोजन पोलीस बॉईज असोशियन संस्थापक रवी नानाभाऊ वैद्य, धीरज पार्सेकर, सुशील मोरे, अमोल माने, अमोल पटेकर, प्रकाश शेरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले.







