आयपीएल सामन्यांवर सट्टा, बुकी पिता-पुत्र गजाआड

ipl

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – आयपीएल सामन्यांवर मोबाईल फोनद्वारे सट्टा घेणाऱ्या बुकी पिता पुत्राच्या अड्ड्यावर पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या विशेष पथकाने छापा टाकून अटक केली आहे.

 

 

पोलिसांनी मोबाईल, राऊटर, डायरी असा एकूण 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. नेमीचंद शांतीलाल कासलीवाल, वय 56, आकाश नेमीचंद कासलीवाल, वय 35, राहणार काचिवाडा, औरंगाबाद या बुकी पिता पुत्राला अटक केली आहे. जीन्सी पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल झालेला मास्टरमाइंड दगडा अजूनही फरार आहे. बुकींनी मोबाईल, इंटरनेटवर घेतलेल्या सट्ट्यांवर 70 ते 80 लाखांचा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

 

 

तपासात आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे. डायरीत गोट्या सिरसाठ, देवानंद, सचिन ओम, अक्षय भारत, आदीत्य, सिकंदर, कृष्णा, अनिल, जीवन, युनूस, हेमंत, नासेर, आकाश, आनंद, आनिस, रवी काला, साकला, योगेश आदींची नावे आढळली. हे पाच ते दहा हजारांचा सट्टा लावत होते. त्यांच्या नावासमोर हि रक्कम लिहली आहे. अर्धवट नावे असल्याने त्यांना शोधणे पोलीसांसमोर आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here