कोरोनासंदर्भात शहरात वासुदेवांची जनजागृती

kultabad-vasudev

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

 

 


लोककलावंतांचा जागर या माध्यमातून शाहीर मुकिंदा कानडे, शाहीर अरुण कटक हे वासुदेव कार्यक्रमाच्या माध्यमातून सकाळच्या प्रहरी शहरातील विविध भागात फिरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेगवेगळे संदेश देत जनजागृती करत आहे. शहरातील विद्यानगर , न्यायनगर, पुंडलिक नगर ,पारिजात नगर ,ठाकरे नगर ,जय भवानी नगर ,शिवनेरी कॉलनी, राज नगर, विश्रांती नगर, गजानन नगर, भारत नगर ,भवानी नगर, सुराणा नगर, गणेश नगर ,अविष्कार कॉलनी आदी भागात फिरून जनजागृती करीत आहेत.

 

 


या वासुदेवांच्या लोककलांमधून नागरिकांना कोरोना विषयी वेगवेगळ्या उदाहरणासहित महत्त्व पटवून देत मराठमोळ्या भाषेत जनजागृती करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here